स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचा साक्षात संचार होऊन ते स्वतः भक्तांशी बोलतात असा बहाणा करून कोल्हापुरसह परिसरातील भाविकांना लाखो रुपयांचा गंडा – प्रवीण विजय फडणीस ,श्रीधर नारायण सहस्त्रबुद्धे,सविता अनिल अष्टेकर यां टोळीला अटक

स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचा साक्षात संचार होऊन ते स्वतः भक्तांशी बोलतात असा बहाणा करून कोल्हापुरसह परिसरातील भाविकांना लाखो रुपयांचा गंडा घालून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण व राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी पर्दाफाश केला. मुख्य संशयितांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. प्रवीण विजय फडणीस (वय ४४, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), […]

Continue Reading

गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या ‘मेरी आवाज सुनो’चा आवाजच कोरोनामुळे लुप्त

कितीही सराईत, निर्ढावलेला अथवा भावनाशून्य गुन्हेगार असो, त्याला पोलिस ठाण्यातील ‘मेरी आवाज सुनो’चे दर्शन झाले, की भलेभले गुन्हेगार बोलते होतात. मात्र, सध्या कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने पोलिस गुन्हेगारांच्या जवळ जाण्यास दचकत असल्याने त्यांना बोलते करणे तर दूरच, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एकीकडे ‘मेरी आवाज सुनो’च्या माध्यमातून तोंड उघडण्यास भाग पाडणाऱ्या गुन्हेगारांना अच्छे दिन आले असून, दुसरीकडे […]

Continue Reading

नवे दानवाड चेक पोस्टवर स्वयंसेवकाला जातीवाचक शिवीगाळ, कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी

नवे दानवाड तालुका शिरोळ येथील चेक पोस्टवर सेवा बजावणाऱ्या स्वयंसेवकांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युनूस लाडखान राहणार दत्तवाड तालुका शिरोळ यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद गोपाळ लक्ष्मण कांबळे नवे दानवाड यांनी पोलिसात दिली आहे याबाबत कुरुंदवाड पोलिसांतून मिळालेली माहिती अशी बुधवारी […]

Continue Reading

यंत्रमाग व्यवसायासमोर कामगारांची अडचन,लॉकडाऊन उठवल्या नंतर कामगारांची टंचाई ,उद्योजक हवालदिल

इचलकरंजी : शहरातील सुमारे 45 हजार कामगार येत्या नजीकच्या काळात आपल्या गावी परतणार आहेत. याचा मोठा फटका यंत्रमाग व्यवसायाला बसणार असून शहरातील जेमतेम 20 ते 25 टक्केच यंत्रमाग सद्यस्थितीला सुरू झाले आहेत. या यंत्रमागावर काम करणार्‍या कामगारांना गावाकडे जाण्यास परवानगी मिळाल्यास सुरू असलेले कारखाने ठप्प होण्याची भिती व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे. इचलकरंजी शहर व परिसरात सुमारे […]

Continue Reading

दलित युवा वेदिकेच्या संस्थापक अध्यक्ष सिध्दू कणमडी धारदार शस्त्राने खून

पूर्ववैमनस्यातून दलित युवा वेदिकेच्या संस्थापक अध्यक्षाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना गोकाक येथे बुधवारी रात्री घडली. उपचारासाठी बेळगावकडे घेऊन जात असताना तो मृत झाला. सिद्धू अर्जुन कणमडी (27, रा. आदीजांबव नगर गोकाक) असे मृताचे नाव आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेतील आरोपींनी ओळख लपविण्यासाठी तोंडावर कपडे बांधले होते. गंभीर जखमीस उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले; […]

Continue Reading

हसूर बुद्रुक येथे युवकाची आत्महत्या…

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : हसूर बुद्रुक (ता. कागल) येथील काकासाहेब शांताराम बोटे (वय ४०) यांनी जोगू झऱ्याजवळील जंगलात सागाच्या झाडाला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची मुरगूड पोलिसांत नोंद झाली आहे. कोरोनो दक्षता समिती आणि पत्नीबरोबर वाद झाल्यानंतर नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Continue Reading

लॉकडाउनमध्ये अडकली, निवृत्त पोलिस महिलेवर बलात्कार

आसाममधील रेल्वे पोलिसातील (जीआरपी) एका ५० वर्षीय निवृत्त उपनिरीक्षक महिलेवर पंजाबमधील फिरोझपूरमध्ये दोघांनी कथित बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. लॉकडाउनमुळे फिरोझाबादेत कर्फ्यू लागू करण्यात आल्यानंतर ही महिला एका मदत केंद्रात राहात होती. ही घटना १ मे या दिवशी घडल्याचे सांगितले जात आहे. पीडित महिला जम्मूतील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात कर्तव्यावर होती. या महिलेचे पती […]

Continue Reading

रस्त्यांवर थुंकल्याप्रकरणी मोटारसायकलस्वारावर गुन्हा

रस्त्यांवर मावा खाऊन थुंकल्याप्रकरणी मोटारसायकलस्वारावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. विक्रम विद्याधर नांदगावकर (वय ३९, रा. सानेगुरुजी वसाहत, मूळ रा. रत्नागिरी) असे त्या संशयिताचे नाव आहे. बसंत बहार रोडवर हा प्रकार घडला. सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपूरकर यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई केली. याबाबत शहर नियंत्रण शाखेचे निरीक्षक वसंत बाबर यांनी […]

Continue Reading

प्रेयसीला जास्त पगार असल्याने आयटी अभियंत्यांची आत्महत्या; पिंपरीतील घटना

भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिखरावर पोहचवणाऱ्या आयटी क्षेत्रात ही बुरसटलेले विचार काही प्रमाणात पाय रोवून आहेत. हे अधोरेखित करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील घटना पुरेशी आहे. आयटी अभियंता प्रसून कुमार झा च्या आत्महत्येनंतर समोर आलेलं कारण हे धक्कादायक आहे. प्रेयसीला अधिकचा पगार असल्याने प्रसून तिच्याशी वाद घालत असून तिच्यावर शंकाही घेत असे. आज सकाळी दोघांमध्ये खटके उडाले आणि […]

Continue Reading

PoKमध्ये ब्लड बँकेच्या नावाखाली सेक्स रॅकेट, JuDच्या नेत्याला अटक

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील जमात-उत-दावा (JuD) या दहशतवादी संघटनेचा नेता सैयद समीर बुखारी याला सेक्स रॅकेटप्रकरणी पाकव्याप्त काश्मीरमधील बाग शहरात अटक करण्यात आली आहे. सैयद समीर बुखारी हा जमात-उत-दावा संघटनेशी संबंधित अल-महफिज फाऊंडेशन चालवत होता. हे फाऊंडेशन मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या नेतृत्वातील दहशतवादी संघटना जमात-उत-दावाचा एक हिस्सा आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, एक व्हिडिओ […]

Continue Reading