
पारगाव वार्ताहर (ता.२१) त्रिभुज शेळके
दौंड तालुक्यातील पारगाव (सा. मा ) येथे ३९५ वि सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात पार पडली.
या भव्य दिव्य शिवजयंती निमित्त घोडे, उंट याच बरोबर मल्ल खांब हा मर्दानी खेळ, तसेच संबळ पथक, पोतराज पथक, शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम,बेंजो ग्रुप,विविध वाद्य व १२० शालेय विद्यार्थ्यांचे ऐत्याहासिक वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पुरातन लोक कलेचे आयोजन करण्यात आले होते.
कंटेनर ट्रेलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची सिहंसनारूढ भव्य मूर्ती व समोर मल्ल खांबावरील लहान मल्लांची प्रात्यक्षिके सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पारगाव फाटा येथून सुरु झालेली मिरवणूक हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत १० वाजता छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी पोहचली. त्या ठिकाणी व्याख्याते व पत्रकार राजेंद्र खोमणे यांनी “गर्जा महाराष्ट्र माझा ‘हे गीत साजरे केले.अभिनेता सागर शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ३० मिनिटांचे “पावनखिंड ‘ हे लघुनाट्य सादर केले.त्या नंतर उपस्थित महिलांच्या हस्ते पाळणा गाऊन शिवजनमोस्तव साजरा करण्यात आला व शिव आरती नंतर सर्वांसाठी महाप्रसाद भोजनाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या वेळी महिलांची संख्या ही लक्षनीय होती. या वेळी गावातील मान्यवरांच्या हस्ते सर्व कलाकार, अथिती यांचा सत्कार करण्यात आला.या साठी पारगाव येथील सर्व तरुण शिवभक्त व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
Discussion about this post