राष्ट्रीय पक्षी मोराचे संवर्धन

पारगाव : अप्पासाहेब सावंत यांच्या शेतात धान्य खात असलेले मोर.(छायाचित्र -आबा शेलार )
त्रिभुज शेळके पारगाव वार्ताहर (ता.८)
समाजामध्ये अनेक प्रकारचे छंद जोपसणारे लोक असतात.आपण त्या बद्दल नेहमी ऐकत असतो. दौंड तालुक्यातील पारगाव येथील एक शेतकरी राष्ट्रीय पक्षी मोर संवर्धणासाठी लाखाची पदरमोड करणारे सुनील उर्फ अप्पासाहेब सावंत व त्यांचे कुटुंबीय असून दौंड तालुक्यातील पारगाव येथे त्यांचे फार्म हाऊस आहे.
सावंत यांना प्राणी व पक्षी संगोपणाची आवड असल्याने आपल्या शेतात त्यांनी पक्षी प्राण्यांना पाणी पिण्यासाठी दगडाच्या कुंड्या ठेवल्या आहेत.आपल्या पासून किंवा आपल्या शेतात काम करणाऱ्या मजूरापासून प्राण्यांना काही त्रास होणार नाही याची ते नेहमीच काळजी घेत असतात.
चार वर्षांपूर्वी अप्पा सावंत यांनी मोराची चिंचोली येथील एका मित्राकडून मोराची १५ अंडी आणली होती.हि अंडी उबवन मशीन मध्ये ठेऊन १५ पिल्ले तयार करण्यात आली.सुरवातीला काही दिवस ती पिल्ले कोंबडीच्या पिलामध्ये ठेवण्यात आली.नंतर जसजसी ति पिल्ले मोठी होत गेली तसतशी ति नैसर्गिक अधिवासात उडून गेली. परंतु अप्पा सावंत यांच्या घराचा लागलेला लळा मात्र तुटला नाही.रोज सकाळी काही वेळ व सायंकाळी सावंत यांच्या नारळाच्या झाडावर ते मुक्कामाला येत आहेत.
त्या नंतर अप्पा सावंत यांनी याच मोरांची त्यांच्या च शेतात ६० अंडी गोळा करून पुन्हा ६० पिल्ले तयार केली. काही काळा नंतर ति ही नैसर्गिक अधिवासात उडून गेली.परंतु दिवसा कुठेही भटकंती केली तरी सायंकाळी या सर्व मोरांचा मुक्काम हा अप्पासाहेब यांच्या बागेतील झाडांवर असतो.
मोरांसाठी खाद्याची उत्तम व्यवस्था..
या मो्रांसाठी सावंत यांना सध्या रोज १५ किलो धान्य लागते.या साठी ते पुणे येथील धान्य बाजार येथून खाली सांडलेले धान्य (मात्र ) खरेदी करतातं ते उपलब्ध न झाल्यास शेतात पिकवलेला गहू हा राखून ठेवलेला असतोच या मोरांच्या खाद्यासाठी वर्षाकाठी एक लाख रुपये इतका खर्च करतात.या कामी त्यांना त्यांच्या पत्नी अश्विनी,मुलगा बाळासाहेब सहकार्य करतात.
वर्षाकाठी मोरांच्या खाद्यावर इतके मोठ्या प्रमाणात खर्च होत असून सुद्धा कुटुंबातील कोणता हि सदस्य या बाबत तक्रार करीत नाही.काही कारणास्तव एखादे दिवशी मोर आले नाही.तर अप्पासाहेब बेचैन होतात. व मोर न येण्या मागचे कारण शोधून पुन्हा तसा प्रकार होणार नाही याची काळजी घेतात.
अप्पासाहेब सावंत यांनी सात ते आठ घोरपडीना सुद्धा जीवदान दिले आहे.लहान घोरपड पकडून विक्रीसाठी आलेल्या काही आदिवासी लोकांकडून त्या खरेदी करून सावंत यांनी त्या आपल्या रानात सोडून दिल्या आहेत. त्यांच्या साठी ही त्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे. आता या घोरपडी पाच ते सहा किलो वजनाच्या झाल्या असल्याचे अप्पासाहेब सांगतात .
आर्थिक बाजूकडे न पाहता मोरांसाठी त्याग…
अप्पासाहेबांची एक चिक्कूची बाग आहे.प्रत्येकवर्षी ती व्यापाऱ्यांना विकली जाते.परंतु प्रत्येकवर्षी ती बाग विकताना अप्पासाहेबांची त्यात सुद्धा एक अट असते. एप्रिल महिन्यापर्यंत जितके चिकू निघतील तितकेच घ्यायचे.एप्रिल नंतर राहिलेल्या चिकू वर पक्षांचा अधिकार राहणार व एप्रिल नंतर ती बाग अक्षरशः पक्षांसाठी सोडली जाते आप्पासाहेबांच्या बागेत पाच ते सहा घुबड सुद्धा पाच वर्षांपासून वास्तव्याला आहेत.अप्पासाहेब सावंत यांच्या या प्राणी पक्षी संगोपणात त्यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी होत आहे.सकाळी व सायंकाळी आप्पासाहेबांच्या घराभोवती पक्षांचा जोरजोराचा किलबिलट चालू असतो.या मध्येच परमेश्वराचा वास आहे असे आप्पासाहेब सावंत सांगतात.पारगाव परिसरात क्वचित च मोरांचे दर्शन होते परंतु अप्पासाहेब सावंत यांच्या शेतात मोरांची शाळा भरत आहे.वर्षभर होणारा खर्च व पिकांच्या नुकसानी बद्दल अप्पासाहेबांना विचारल्या नंतर ते हसत म्हणतात ‘सारी भूमी गोपालकी’.
Discussion about this post