
यवत (दि.१९) वार्ताहर
दौंड तालुक्यातील भांडगाव येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे स्नेहसंमेलन कार्यक्रम सपन्न झाला.यावेळी शाळेने स्नेहसंमेलन दिनानिमित्त स्वतःचा शाळेचा लोगो तयार करण्यात आला व त्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.शाळेचा लोगो म्हणजे ज्ञान,गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रगती यांच्या एकत्रित विचारांचे प्रदर्शन करतो.जो विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मार्गदर्शन करण्याच्या उर्जेवर आधारित आहे.
यावेळी स्नेहसंमेलन प्रसंगी घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा सकारून छत्रपती शिवाजी महाराज अवतरले असल्याचे छान पात्र विद्यार्थी यांच्याकडून सादर करण्यात आले.यावेळी विद्यार्थी आणि ग्रामस्थानी छत्रपती शिवाजी महाराज कि जय यांच्या घोषणां देत जल्लोष केला यां घोषणामुळे परिसर दुमदुमुंन गेला होता.
इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या नृत्याविष्कार सादर करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.विविध प्रकारच्या नृत्यांचे सादरीकरण बालचमूंनी केले.विद्यार्थ्यांच्या अतिउत्कृष्ट सादरीकरणा साठी प्रेक्षकांनी पालक आणि ग्रामस्थांनी ७५००० रुपये रोख बक्षिस स्वरूपात दिले.
तसेच पीएमश्री शाळेचा अनोखा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे शिंपल्यातील मोती या हस्तलिखिताचे उद्घाटन करण्यात आले.जसे शिंपल्यातून मोती बाहेर पडतात तसे राष्ट्रीय प्रतिके, राष्ट्रीय सण, किल्ले, समाजसुधारक , सावित्रीबाई फुले , ऐतिहासिक स्थळे,संत,शाळेच्या अभिमानस्पद लेख,पदाधिकाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे अभिप्राय पत्र,शिक्षकांचे अनुभव,लेख विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे,असे शिक्षक – पालक व विद्यार्थी यांचे लेखन व शाळेच्या प्रगतीच्या बातम्या हे सर्व म्हणजे मोतीच आहे.हस्तलिखित म्हणजे जणू शाळेच्या प्रगतीचा आरसा होय असे मत उपस्थितानी कार्यक्रम प्रसंगी मांडले.
यावेळी कार्यक्रमासाठी दौंड पंचायत समितीचे उपसभापती नितीन दोरगे, सरपंच लक्ष्मण काटकर, उपसरपंच नंदा जाधव, तुषार शेंडगे, प्रमोद दोरगे, रूपाली खळदकर, निलम दोरगे, सुनंदा गायकवाड, राहुल खळदकर, माजी सरपंच कमल टेळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रगती दिक्षीत, उपाध्यक्ष रविंद्र दोरगे, केंद्रप्रमुख संजय चव्हाण,अमित दोरगे, लक्ष्मण दोरगे,प्रकाश बोरकर,राहुल बोरकर,शिवाजी जाधव, कर्तव्य फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम कापरे, शिक्षक प्रशांत चिरके,शरद बारवकर,रामदास बारवकर , सुदाम जाधव,अकुंश चौधरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक संजय तावरे ,उपशिक्षिका अनिता जुन्नरकर,नेहा शिंदे, सोनाली गिरमे,स्वाती पिसाळ,अलका इंदलकर,आरती जगताप यांनी केले .
Discussion about this post