
संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव (ता.७) दौंड तालुक्याचे स्व.माजी आमदार राजारामबापू ताकवणे यांचा २६ वा स्मृतीदिन आज पारगाव येथील श्री लीला लॉन्स या ठिकाणी उत्साहात पार पडला. दौंड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फाउंडेशन व स्वर्गीय आमदार राजारामबापू ताकवणे प्रतिष्ठान दौंड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक गरजू लोकांनी याचा लाभ घेतला.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम पूजन करण्यात आले.
त्यानंतर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संभाजी ताकवणे,माजी सरपंच सोमनाथ ताकवणे, सुनील ताकवणे, सर्जेराव भोसले, विजय शिवरकर यांनी प्रथम रक्तदान करून शिबिरास सुरवात झाली.
या वेळी पंचायत समिती माजी उपसभापती सयाजी ताकवणे, सरपंच सुभाष बोत्रे, माजी सरपंच सर्जेराव जेधे, भा ज. पा. चे तानाजी दिवेकर,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक संभाजी ताकवणे, राम गाडेकर,माजी सरपंच रा. वि. शिशुपाल,तंटामुक्ती अध्यक्ष रमेश बोत्रे, नानगांव चे उपसरपंच विष्णू खराडे,शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम,उद्योजक तुकाराम शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दौंड तालुका सरचिटणीस महेश ताकवले यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत पारगाव व पारगाव वि. का. सेवा सोसायटी यांना नामदेवबापू ताकवणे यांच्या हस्ते स्व. माजी आमदार राजाराम बापू ताकवणे यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
स्व. माजी आमदार राजारामबापू ताकवणे यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नामदेवबापू ताकवणे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.पारगाव या ठिकाणी स्व. माजी आमदार राजाराम बापू ताकवणे यांचा पुतळा उभारण्यासाठी सर्जेराव जेधे व तुकाराम शितोळे यांनी प्रत्येकी एक लाख,तर सयाजी ताकवणे व सुभाष बोत्रे यांनी प्रत्येकी ५१ हजार जाहीर केले. लवकरच स्व. राजाराम बापू ताकवणे यांचा पूर्णकृती पुतळा पारगाव मध्ये उभा राहणार आहे.
या वेळी भिमा पाटस कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे,पारगाव सोसायटी चे चेअरमन मच्छिंद्र ताकवणे,कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक अतुल ताकवणे,माजी सरपंच सुरेश ताकवणे,ग्रामपंचायत सदस्य निलेश बोत्रे, निवृत्त न्यायाधीश विकास शेळके,माजी उपसरपंच सोमनाथ ताकवणे व विजय शिवरकर,पारगाव सोसायटी चे माजी व्हाईस चेअरमन दिलीप होले, खरेदी विक्री संघांचे संचालक नानासो जेधे, खरेदी विक्री संघांचे माजी संचालक संतोष ताकवणे, निवृत्त बँक इन्स्पेक्टर विजय चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.




Discussion about this post