
(मंदिर परिसरात श्वानपथकद्वारे शोध घेताना पुणे ग्रामीण पोलीस)
संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव (ता.१०)
दौंड तालुक्यातील पारगाव येथील ग्रामदैवत श्री. तुकाईदेवी मंदिरातील दोन दानपेट्या चोरट्यानी फोडून त्यातील वर्षभराचे जमा झालेले दान घेऊन पोबारा केला आहे.या पूर्वी हि मंदिरात दोन वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. दि.९ जानेवारी रोजी मंदिराचे पुजारी गणेश गुरव हे पहाटे ४:३० वाजता पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता. मंदिराचे लोखंडी गेट व लाकडी दरवाजाचे कुलूप तुटून दरवाजा अर्धवट उघडलेल्या अवस्थेत दिसला.सदर घटनेची माहिती विश्वस्त, ग्रामस्थ व यवत पोलीस स्टेशन कळविण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजन मायने, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर वागज, पोलीस कर्मचारी विकास कापरे, गुरु गायकवाड आदी पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ठसे तज्ञ् व श्वान पथकास हि पाचरण करण्यात आले होते. चोरट्याने जीन्स पॅन्ट, जर्किन, हातमोजे व तोंडाला रुमाल बांधला होता. चोरट्याची सर्व हालचाल सि. सि. टीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. या बाबत मंदिराचे विश्वस्त रामचंद्र भालेराव, संतोष भालेराव, गणेश भालेराव यांनी यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.
अनेक महिन्यापासून दानपेटी उघडण्यात आली नव्हती. त्या मुळे मोठ्या प्रमाणात रक्कम चोरीला गेली असल्याचा अंदाज आहे.
– रामचंद्र भालेराव मंदिर विश्वस्त




Discussion about this post