शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग…गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा….

संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.१९)
दौंड तालुक्यातील एका मोठ्या गावातील नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या हायस्कुलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन १४ वर्षीय विद्यार्थिनीचा एका ४७ वर्षीय शिक्षकाने (दि.१८) रोजी दुपारी दोन वाजता विनयभंग केल्याची घटना घडली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे गुरु शिष्याच्या नात्याला या शिक्षकाने काळिमा फासली आहे.या घटनेनंतर अनेक पालकांनी या शिक्षकास बेदम चोप दिला असल्याची माहिती समोर येत आहे.या ४७ वर्षीय शिक्षकाला सदर पालकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती तालुक्यातील एका मोठ्या गावातील नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या हायस्कुलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. दुपारच्या सुमारास या ४७ वर्षीय शिक्षकाने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती दिली व घडलेली घटना मुलीने फोन करून वडिलांना सांगितली व तत्काळ शाळेत येण्यास सांगितले.मुलीचे वडील हे मोल मजुरीचे काम करीत असून कामानिमित्त ते नांनगाव या ठिकाणी गेले होते.मुलीचे वडील शाळेत आल्या नंतर घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी ११२ या नंबर वर तक्रार दाखल केली.
यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख,सहाय्य्क पोलीस निरीक्षक किशोर वागज,पोलीस कर्मचारी अतुल राऊत,परशुराम म्हस्के यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली, असून यवत पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरा या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.
या निंदनीय घटनेमुळे पालक वर्गात मुलींच्या असुरक्षते बद्दल भावना निर्माण झाली आहे.शाळेत सुधा आपल्या मुली सुरक्षित नसल्याची भावना आता पालकांच्यात निर्माण झाली आहे.
निर्भया पाथकांची आवश्यकता….. शाळेतील आणि कॉलेजमधील मुली त्याचप्रमाणे शाळा,कॉलेज, आणि रस्त्याने फिरणाऱ्या व मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिंयोंवर नजर आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासनाने निर्भया पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार केली आहेत मात्र दिवसेंदिवस मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसू लागले आहे. आता तर मात्र शाळेत देखील मुली सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.मात्र ही निर्भया पथक नावालाच आहे की काय? असा देखील सवाल आता नागरिक करू लागले आहेत.




Discussion about this post