
(फोटो – संविधान दिन साजरा करताना मान्यवर)
पारगाव संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.२६)
दौंड तालुक्यातील नानगांव गणेशरोड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती. भारतीय संविधानाचा अंतिम मसुदा भारतीय संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला. त्या मुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.
भीमापाटस कारखान्याचे संचालक आबासाहेब खळदकर यांनी आपल्या भाषणातून संविधान दिनाचे महत्व पटवून दिले. या वेळी सरपंच शीतल शिंदे, उपसरपंच विष्णू खराडे, आबासाहेब खदडकर, संदीप खळदकर, विठ्ठल खराडे, नाना रणदिवे, विकास शेलार, आप्पासो रासकर, नामदेव खराडे, विश्वास गुंड,आशिष आढागळे, विशाल आखाडे, नितीन झेंडे, दीपक पवार, सतीश पवार इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन उपसरपंच विष्णू खराडे यांनी तर आभार माणिक आढागळे यांनी मानले.




Discussion about this post