
फोटो – पारगाव येथे शेतकऱ्याच्या शेतात दोन रानगव्यांचे दर्शन झाले.
पारगाव प्रतिनिधी (दि.०१)
दौंड तालुक्यातील पारगाव या ठिकाणी आज (दि.०१) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास भिमा नदी काठच्या शेतात दोन रानगवे दिसल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत नितिन बोत्रे यांच्या शेतात सचिन चव्हाण हे ट्रॅक्टरने मशागत करीत असताना बोत्रे यांच्या उसाच्या शेतातून पूर्ण वाढ झालेले दोन जंगली गवे बाहेर बांधावर येऊन उभे असलेले त्यांना दिसले व काही वेळाने पुन्हा उसाच्या शेतात गेले. जवळच नितीन बोत्रे यांच्या पत्नी शेतात काम करीत होत्या.त्यांना तातडीने तेथून बाहेर येण्यास सांगण्यात आले. याबाबतची माहिती वन विभाग कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.या जंगली गव्यांच्या दर्शनाने शेतकरी वर्गात मोठे भीतीचे वातावरण झाले आहे असून उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि वारंवार वीज जात असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी व विद्युत पंप चालू करण्यासाठी वारंवार नदीला जावे लागते.मागील १५ दिवसांपूर्वी राहू परिसरात गव्याचे दर्शन झाले होते.त्यामुळे वनविभागाने तातडीने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.
अगोदरच बिबट्यामुळे शेतकरी भयभीत असतानाच या परिसरात गव्यांचे दर्शन म्हणजे शेतकऱ्यांवर आलेल हे नवीन संकट समोर आहे वन विभागाने तातडीने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून आणि नागरिकांतून होउ लागली आहे.
Discussion about this post