
पारगाव – शाळेला टीव्ही संच देताना व नवोगत विध्यार्थी यांचे स्वागत करताना मान्यवर.
संघर्षनायक वृत्तसेवा पारगाव (ता.१७)
आज दि. १६ रोजी दौंड तालुक्यातील पारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांनी “शाळा प्रवेशोत्सव ” साजरा करण्यात आला.
राज्यातील काही विभाग वगळता सर्वच ठिकाणी आज शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शाळा प्रवेश चालू झाला आहे. त्या अनुषंगाने पारगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा परिषद शाळे पर्यंत सर्व उपस्थित विध्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी विविध रंगाच्या फुग्यांनी सजवलेली शाळेची कमान बाल चमूंचे लक्ष वेधून घेत होती. नवोगत विद्यार्थ्यांना गुलाबाचे पुष्प व कागदी टोप्या देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी नवोगत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची भीती न जाणवता हास्य उमटले होते.
माजी सरपंच सर्जेराव जेधे यांच्या वतीने सर्व नवोगत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट म्हणून देण्यात आली. तर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विशाल ताकवणे, उद्योजक मनोज बोत्रे व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नितीन बोत्रे यांनी प्रत्येकी एक गरीब विद्यार्थ्याला इयत्ता चौथी पर्यंत शैक्षणिक पालक
दत्तक घेतले. विशाल ताकवणे यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून शेंगदाणा लाडूचे वाटप केले. तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन बांदल यांच्या वतीने अल्पोपहार व सालू मालू मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे देण्यात आले. वैभव बबन बोत्रे यांच्या वतीने शाळे च्या ग्राउंड सफाई सफाई साठी तीन तास जे सि बि उपलब्ध करून देण्यात आला तर सचिन ताकवणे यांचे कडून पहिलीच्या मुलांना मोफत ओळखपत्र तयार करून मिळणार आहे.
काल शाळा प्रवेशोत्सव चे औचित्य साधून पारगाव ग्रामपंचायत च्या माध्यमातून वित्त आयोग बंधित निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक पारगाव शाळेत ६ एलईडी टीव्ही संच बसविण्यात आले. या मुळे मुलांना बाह्य जगाची ओळख व डिजिटल शिक्षण मिळणार असून त्या द्वारे मुलांची ज्ञानवृद्धी होणार आहे.
पारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हि इयत्ता चौथी पर्यंत तालुक्यात सर्वात जास्त पट असणारी शाळा म्हणून तिचा नाव लौकिक आहे. अनेक वर्षांपासून शाळेची पट संख्या हि ३०० च्या पुढे राहण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या आजी-माजी अध्यक्ष व सदस्याचा मोलाचा वाटा आहे. या वर्षी पहिल्याच दिवशी पाहिली च्या ५६ नवोगत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तो आकडा ८० पर्यंत जाणार असल्याचे शाळा व्यस्थापन समिती कडून सांगण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बद्दल घडविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ३५४६ शाळांपैकी ३०८ शाळा या “पुणे मॉडेल स्कुल ” म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. त्यासाठी दौंड तालुक्यातुन एकमेव पारगाव शाळेची निवड करण्यात आली असून त्या द्वारे पारंपरिकतेच्या पुढे जाऊन नव्या पिढीला आधुनिक शिक्षण मिळणार आहे.
या वेळी सरपंच सुभाष बोत्रे, पंचायत समिती सदस्य सयाजी ताकवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, माजी सरपंच सर्जेराव जेधे, माजी सरपंच जयश्री ताकवणे, ग्राम विकास अधिकारी मुरलीधर बडे, ग्रा. पं. सदस्य निलेश बोत्रे, ग्रा. पं. सदस्या सोनाली शेळके, शाळा केंद्र प्रमुख शाम बेंद्रे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन बांदल, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विशाल ताकवणे, गणेश बोत्रे,शुभांगी रणदिवे,संजय ताकवणे, दत्तात्रय ताकवणे, मनोज बोत्रे, समीर बोत्रे,प्रभारी मुख्याध्यापीका काटे मॅडम,सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.राजवैभव इलेक्ट्रॉनिकचे वैभव बोत्रे यांनी हे टीव्ही शाळेत बसवून दिले.छगन खळदकर यांनी सूत्र संचालन तर शहाजी गिरी यांनी आभार मानले.
Discussion about this post