
फोटो:- संगम पुलावरून पंढरपूर कडे प्रस्थान करताना श्री. संतराज महाराज पालखी सोहळा
संघर्षनायक वृत्तसेवा पारगाव ता.२२
श्री क्षेत्र संगम वाळकी (ता. दौड) येथील श्री संतराज महाराज पालखी सोहळ्याचे आषाढ़ वारीसाठी आज रविवार (दि.२२) रोजी दुपारी १:३० वाजता विठूनामाच्या गजरात पंढरपूर कडे प्रस्थान झाले.
कोंडेवस्ती या ठिकाणी कोंडे परिवाराकडून वारकऱ्यांना खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले. त्या नंतर पालखी मुकामासाठी एकेरीवाडी कडे रवाना झाली. पालखीसाठी सादलगाव येथील हरिभाऊ शंकर चांदगुडे यांच्या सोन्या- राजा या बैल जोडीला आणि नागरगाव येथील सुभाष हनुमंत शेलार व तुकाराम हनुमंत शेलार यांच्या सोन्या – मोन्या या बैल जोड्यांना या वर्षीचा पालखीचा रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. नगाऱ्याची गाडी त्या मागे मानाचा अश्व राजवीर व त्या मागे श्री संतराव महाराज यांची पालखी व पालखी सोबत विठू नामाच्या गजरात तल्लीन
झालेल्या वैष्णवांच्या मांदयाळीचा भव्य नेत्रदीपक सोहळा वाळकी संगम पुलावरून मार्गस्थ झाला.
मागील वर्षी पेक्षा हि जास्त जवळपास दहा हजार हुन अधिक भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती.
पालखी सोहळ्याचे हे ५८ वे वर्ष आहे. या सोहळ्यासाठी मागील वर्षापेक्षा जास्त प्रमाणात तालुका व तालुक्याबाहेरील हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती. या पालखी प्रस्थानवेळी दौंड चे आमदार राहूल कुल, शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके माजी आमदार रमेश थोरात, शांतीनाथ महाराज, संतराज महाराज ट्रस्टच्या कायदेशीर सल्लागार व संत ज्ञानेश्वर महाराज ट्रस्टच्या विश्वस्त ऍड.रोहिणी पवार, वीरधवल जगदाळे, मंगलदास बांदल, माऊली ताकवणे , बाळासाहेब थोरात, संतराज महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ह. भ. प. नामदेव (दादा)महाराज साठे. यांची आपल्या भाषणातून या पालखी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजपा महिला राज्य उपाध्यक्षा कांचन कुल,रा. काँ. तालुका अध्यक्ष नितीन दोरगे, पं. स. सदस्य सयाजी ताकवणे,भाजपा तालुका अध्यक्ष राहूल हंडाळ,भिमा पाटस चे संचालक तुकाराम ताकवणे, विकास शेलार,चंद्रकांत नातू, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पोपटराव ताकवणे, उद्योजक पोपटराव शेलार,सुभाष बोत्रे, शिवाजी वाघोले,नारायण जगताप,सुदाम कोंडे,उत्तमराव ताकवले, चंद्रकांत कोंडे,मच्छिंद्र ताकवणे, रमेश बोत्रे, सुनील ताकवणे, मारुती बोत्रे,नरेंद्र काटे, निखिल तांबे व संतराज महाराज पवार ट्रस्ट चे, सर्व विश्वस्त पंचक्रोशीतील अनेक मान्यवर भाविक भक्त उपस्थित होते.
Discussion about this post