उपस्थित नागरिकांकडून पीएमपीएल च्या बसचे स्वागत करण्यात आले.

पारगाव संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.१५)
१५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर नव्याने चालू झालेल्या हडपसर – चौफुला – पारगाव- नाव्हरे या बस चे पारगाव चौकात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या बस सेवेमुळे नाव्हरे – चौफुला व स्वारगेट पुणे हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, शालेय विध्यार्थी, व्यापारी वर्ग यांना अतिशय चांगला लाभ मिळणार आहे.
पारगाव ते हडपसर बस सेवा चालू होण्यासाठी दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे यांनी एक वर्षांपासून पाठपुरावा केला होता.
या वेळी पि. एम. पि. एल. चे डेपो मॅनेजर विक्रम सिंग शितोळे, शेवाळवाडी डेपो मॅनेजर मनोहर पिसाळ, पि. एम. पि. एल. चे अधिकारी दत्ता बडदे, विजय जगताप, सुरेश थोरात, आनंदा थोरात तसेच पारगाव सरपंच सुभाष बोत्रे, सयाजी ताकवणे, संचालक पोपटराव ताकवणे, सर्जेराव जेधे,नामदेव ताकवणे, सोमनाथ ताकवणे, नानासाहेब जेधे,मधुकर ताकवणे, विजय चव्हाण, किसन जगदाळे,संभाजी ताकवणे, निलेश बोत्रे, रामकृष्ण ताकवणे,हनुमंत बोत्रे, विशाल ताकवणे, उत्तमराव ताकवणे, महादेव ताकवणे, बाळासो बोत्रे, मच्छिंद्र कदम, निलेश ताकवणे, संजय ताकवणे, सुभाष ताकवणे, रफिक सय्यद, नितीन बोत्रे, अनिल ताकवणे, अप्पा कदम, अंकुश शिळमकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बस चालक व वाहक या दोघांचा सत्कार करण्यात आला.
हि प्रत्येक बस नाव्हरा आल्या नंतर नाव्हरे -पारगाव -चौफुला- नाव्हरे अशी एक फेरी मारणार अन पुन्हा हडपसर ला जाणार असल्याचे डेपो मॅनेजर विक्रमसिंह शितोळे यांनी सांगितले.
Discussion about this post