
(छाया : नवनिर्वाचित चेअरमन विजय खळदकर यांचा सत्कार करताना उपस्थित मान्यवर.)
पारगाव संघर्षनायक वृत्तसेवा (दि.०८)
दौंड तालुक्यातील नानगांव येथील रासाईदेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश रोड येथील विजय जगन्नाथ खळदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मोहन दत्तात्रय गायकवाड यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने हि जागा रिक्त होती.या सोसायटी वर माजी आमदार रमेश थोरात गटाची एक हाती सत्ता असल्याने विजय खळदकर यांची एक मताने निवड करण्यात आली.निवडीनंतर माजी आमदार रमेश थोरात यांनी विजय खळदकर यांचे अभिनंदन केले.
यावेळी माजी सरपंच सी.बी.खळदकर,विश्वासराव भोसले,जालिंदर काळे, डॉक्टर भरत खळदकर, दीपक खळदकर,पांडुरंग खळदकर,बाळासो गुंड,शरद रासकर, ज्ञानदेव काळे, हरिश्चंद्र खळदकर,शारदाताई खळदकर, रंजना गुंड, विशाल शेलार,इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post