माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते उदघाटन,६३ हजार रुपयांचे पारितोषिक.


पारगांव संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.१९)
दौंड तालुक्यातील नानगांव येथील ऍड.नंदकिशोर शेलार, ईश्वर खळदकर व हर्षल खळदकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उस्तवात पिंपळगाव येथील शिव मल्हार प्रतिष्ठानने दहीहंडी फोडून ६३ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.
नानगांव येथील छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.तर पारितोषक वितरण दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती महिला अध्यक्षा ऍड. आश्लेषा शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नानगांव ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून “काळी मैना” या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती राणी शेळके,जिल्हा दूध संघाचे संचालक राहुल दिवेकर, दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी ढमाले, प्रदीप दिवेकर, सारिका भुजबळ, चंद्रकांत खळदकर, डॉ. भरत खळदकर, विश्वासराव भोसले, संदीप शेलार, ऍड.अमोल नागवडे, दादासाहेब खळदकर, हरिचंद्र खळदकर, मोहन गायकवाड, बाळकृष्ण गुंड, रवी काका खळदकर, विजय खळदकर, दीपक खळदकर, विशाल शेलार, चैतन्य वाघोले, प्रफुल्ल शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.सोनबा ढमे यांनी उत्कृष्ठ असे सूत्रसंचालन केले.एकंदरीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
Discussion about this post