संघर्षनायक वृत्तसेवा दौंड (ता.०३)
दौंड तालुक्यातील केडगाव – चौफुला हद्दीमध्ये दोन मटका व्यवसाय करणाऱ्यांनी अक्षरशः हौदोस घातलेला असून यामुळे परिसरातील नागरिकांनी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला असून तो व्यसनाच्या आहारी गेलेला पाहायला मिळत आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव – चौफुला ही प्रामुख्याने बाजारपेठेचे व मोठ्या आर्थिक उलाढाल होणारी तालुक्यातील महत्त्वाची गावे आहेत. चौफुला या ठिकाणी एका हॉटेलमध्ये खालच्या तळमजल्यात हा मटका व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगतच आणि केडगाव बाजारपेठेतील मुख्य बाजारपेठेत या मटका व्यवसाय करनाऱ्यांनी आपली दुकाने राजरोसपणे थाटलेली आहेत.चौफुला आणि केडगाव परिसरात हे दोन मोठे मटकेवाले असून या दोन्हींची मिळून ४० ते ५० बुकिं दुकान, पानटपरी,हॉटेल,गल्लीबोळात या सर्व ऑनलाईन पद्धतीने घेतले जातात.या मटक्याच्या व्यवसायातून दररोजची लाखो रुपयांची उलाढाल चौफुला व केडगाव परिसरात होत आहे.मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आणि मध्यमवर्गीय नागरिक यामुळे कर्जबाजरी झालेले पाहायला मिळत असून या कर्जापायी ते व्यसनाच्या आहारी जाऊन कौटुंबिक कलह वाढलेला पाहायला मिळत आहे.मात्र हा मटकेवाला मस्तावलेला असून खुल्याआम आपली दुकाने थाटून उजळ माथ्याने आपला हा धंदा चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे.चौफुला परिसरातील हा मटकेवाला पोलिसांना देखील वरचढ होत असल्याची चर्चा नागरिकांच्यात आहे.या मस्तवाल मटका किंगवर यवत पोलीस कारवाई करणार का? असादेखील प्रश्न तयार होऊ लागला आहे.
केडगाव चौफुला परिसरात दोन मोठे मटकेवाले आपला व्यवसाय दिवसाढवळ्या राजरोसपणे दुकान थाटून चालवत आहेत. याबाबत त्या मटक्याच्या धंद्यावर वादावादी जरी झाली तरी हे मटकेवाले त्याच ठिकाणी आपापसात मिटवून घेत असून त्याची बाहेर कुठे वाचता होऊ नये यासाठी या सगळ्या भानगडी ते दाबत असतात.या मटकावाल्याचा मुलगा पोलिसांना याकरिता पोसतो का ? अशा प्रकारची उरमट अर्रवाच्या भाषा वापरत असल्याची नागरिकांच्यात चर्चा आहे.
केडगाव – चौफुला परिसरात अवैध धंदे फोफावले.
पुणे ग्रामिण चे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्या नंतर गुटखा, मटका, गांजा, भंगार, वेश्याव्यवसाय या अवैध धंदेवाल्यांचे धाबे दानाणले होते.त्यांनी अवैध धंदे करणाऱ्यावर धडक कारवाईच्या मोहीम राबविल्याने बऱ्यापैकी काळे धंदे करणाऱ्यांचे कंबर्डे मोडले होते मात्र यवत आणि परिसरात मोठया प्रमानत अवैध धंदे वाल्यानी आपले डोके वार काढले असून त्यांच्यावरील कायद्याचा धाक उरला नसल्याने आणि अवैध धंदेवाले डोईजड झाले आल्याचे चित्र सध्या यवत आणि परिसरात पाहायला मिळत आहे.
पोलीस अधीक्षक लक्ष घालणार का ?
यवत पोलीस ठाण्याच्या आणि दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले असून हे कुणाच्या वरदहस्ताने सुरु आहे याची चौकशी होणार का ? आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे धंदे बंद करण्यासाठी लक्ष देणार का ? असा सवाल आता नागरिकांना करू लागले आहेत.
The Review
macOS Sierra
A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart. I am alone, and feel the charm of existence in this spot, which was created for the bliss of souls like mine.
PROS
- Good low light camera
- Water resistant
- Double the internal capacity
CONS
- Lacks clear upgrades
- Same design used for last three phones
- Battery life unimpressive
Discussion about this post