
संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०५)
दौंड तालुक्यातील केडगाव -बोरिपार्धी येथील निरामय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सर केअर सेंटरच्या संचालिका डॉ.गायत्री विशाल खळदकर यांना कोळगाव येथील आनंदगड वारकरी संस्थानच्या वतीने डॉ.गायत्री खळदकर व डॉ.विशाल खळदकर यांच्या गोर गरीब लोकांना होत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल आनंदगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी वारकरी संप्रदयातील अनेक जेष्ठ कीर्तनकर, वारकरी उपस्थित होते.आनंदगड वारकरी संस्थेच्या ह.भ. प.सौ.विद्याताई जगताप महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.गेली चार वर्षांपासून आनंदगड वारकरी संस्थान च्या वतीने समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो.
केडगाव येथील निरामय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डॉ.गायत्री खळदकर व डॉ.विशाल खळदकर यांनी अनेक गोर गरीब रुग्णांचे मोफत ऑपरेशन व उपचार केले आहेत.त्यांच्या यासेवे बद्दल डॉ.गायत्री खळदकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.




Discussion about this post