तरुणांच्या धाडसाचे होतेय सर्वत्र कौतुक, पोलीस प्रशासनाने गस्त वाढवण्याचे नागरिकांनी केले आवाहन.

(फोटो – पारगाव येथील तरुणांनी पाठलाग करून पकडलेले दोन परप्रांतीय चोरटे.)
पारगाव संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.२२)
पारगाव बाजार पेठेतील रामदेव सराफ हे दुकान फोडून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार चोरांपैकी दोन चोरांना पारगाव येथील धाडसी तरुणांनी पकडले असून यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
काल (दि.२१) रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास पारगाव (ता.दौंड) येथील रामदेव सराफ या दुकान जवळ चार चोर आले असल्याचे आयसीआयसी बँकेचे सुरक्षा रक्षक यांना दिसले त्यांनी हि बातमी रामदेव सराफ यांच्या मालकांना व ओंकार ताकवणे यांना फोन करून सांगितली . ओंकार ताकवणे यांनी लगेच फोन वरून इतर सहकाऱ्यांना व याबाबत कळविले.तरुण येत असल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी मागच्या बाजूच्या अंधारातून पळ काढला मात्र ज्या दिशेने चोर पळाले त्या दिशेला राहणाऱ्या काही तरुणांना याबाबत फोन वरून चोर तिकडे गेल्याची माहिती देण्यात आली.त्यामुळे एक तरुणाने घराच्या छतावरून चोर आल्याचे पहिले व फोनवरून त्यांचे लोकेशन इतर तरुणांना सांगितले.रेणुका माथा येथील इंदलकर यांच्या नर्सरीच्या मागे चोर दबा धरून बसले होते.तरुणांना पाहून चोर पळू लागले अर्धा किलोमीटर सिनेस्टाईलने पाठलाग करून दोन चोर पकडण्यात तरुणांना यश आले मात्र अंधाराचा फायदा घेऊन दोन चोर पळून गेले.
यावेळी तरुणांच्या मदतीला दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित होते त्यांच्या ताब्यात या चोरट्याना देण्यात आले.
सराफ दुकानाचे सिसिटीव्ही कॅमेऱ्याची दिशा या चोरट्यांनी फिरवली होती.तसेच गावातीलच एक चोरून आणलेली दुचाकी त्या ठिकाणी मिळाली.पारगाव मध्ये महिन्यापूर्वी चोरीच्या घटना घडल्या होत्या तसेच यापूर्वी तीन वेळा एटिएम फोडण्याचा घटना घडल्या आहेत.
यामध्ये १) राहुल जगदीश मालवी (वय -२८ वर्ष,रा.चडोली ता.निमज,जि.निमज राज्य मध्य प्रदेश)
२) प्रेमचंद पन्नालाल चत्रावत (वय -२२,रा.विजयपूर ता.बशी,जि.चित्तोडगड राजस्थान)हे आरोपी पकडले असून ३)सोनू दशरथ कंजर (रा.करमावत),४) बॉबी हंसराज कंजर कर्मावत दोन्ही राहणार विजयपूर ता.बशी, जि.चित्तोडगड राजस्थान)हे दोन आरोपी फरार असून आरोपीकडुन कोयता, कटावणी, व कात्री अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.चोरांना न्यायालयात दाखल केले असता दोन आरोपीना ६ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने हे करीत आहेत.
पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची नागरिकांची मागणी
वाहतूक पोलिसांचे “नाईट स्कॉड” आणि इतर पथके रात्रीच्या वेळी गुन्हेगारी रोखण्यासाठी गस्त घालतात.यवत पोलीस स्टेशन हद्दी मध्ये ५० गावे असून या पोलीस स्टेशन च्या हद्दीतून पुणे सोलापूर व शिरूर सातारा हे दोन महामार्ग जात असून एक रेल्वे मार्ग हि जात आहे. त्या मुळे यवत पोलीस स्टेशन च्या हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण हि अधिक आहे. परंतु या ५० गावांसाठी रात्रीच्या गस्ती च्या वेळी फक्त एक चार चाकी शासकीय वाहन उपलब्ध आहे.त्या मुळे पोलीस गस्तीसाठी खाजगी गाड्यांचा वापर करताना दिसतात.खरे पाहता कोणत्याही गुन्हेगाराच्या मनात लाल दिव्याची फार भीती असते.म्हणून रात्रीच्या गस्ती साठी पोलीस कर्मचाऱ्यांना या शासकीय चार चाकी वाहनांची च गरज आहे. आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी वाहनांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.




Discussion about this post