सर्वसामान्य नागरिकांची होते आर्थिक फसवणूक…..महसूल विभागाला प्लॉटिंग व्यवसायिकांचे आवाहन

केडगाव संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.१९)
दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात केडगाव – बोरिपारधी यां गावात सर्रास अनधिकृत बेकायदेशीर प्लॉटिंगचा धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत असून यांचेवर कुणाचे नियंत्रण आहे का नाही?असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे.यां प्लॉटिंगच्या पेवामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढू लागले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.या व्यवसायात केडगाव – बोरिपारधी येथील काही दलालच कोणतीही शासकीय पारवानगी न घेता पीक असणाऱ्या शेतीमध्ये अनधिकृतरित्या प्लॉटिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दौंड तालुक्यातील केडगाव – बोरिपारधी ही अत्यंत महत्वाची बाजारपेठेची व महत्वाची गावे असून,पुणे- सोलापूर लोहमार्ग व शिरूर सातारा महामार्गालगत वसलेले आहे.या भागात शेतीसह गुऱ्हाळ व्यवसाय, हॉटेल्स, हॉस्पिटल,शाळा – कॉलेज,दुकाने बाजारपेठ त्यामुळे ही गावे कायम गजबजलेली आहेत.येथील नागरिक हे पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांत नोकरी व व्यवसायानिमित्त जा – ये करत असतात.त्यामुळे केडगाव व बोरिपारधी ही गावे सर्व सोयी सुविधायुक्त असल्याने याठिकाणी नागरिकांचा वास्त्याव्याचा व सगळे काही सोयी यां जवळपास असल्याने तेथे राहण्यासाठी जागा घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.
याचाच फायदा केडगाव – बोरिपारधी येथील काही महाभागानी घेत बोरिपारधी आणि केडगाव परिसरात असणाऱ्या शेतजमिनी शेतकऱ्याकडून करारनामा किंवा कमी दराने एकरी विकत घेऊन,किंवा विसारपावती करून ठराविक रक्कम शेतकऱ्याना देऊन त्यामध्ये कोणतीही शासकीय परवानगी नं घेता सर्रासपणे अनधिकृत प्लॉटिंग सुरु केले आहे.म्हणजे जेणेकरून दोनवेळा मुद्रांक शुल्क भरायला लागू नये यासाठी देखील हे प्लॉटिंग वाले नामी शक्कल लढवत असल्याचे बोलले जात आहे.
बोरिपारधी येथील एका गटात असेच अनधिकृत प्लॉटिंग सुरु असून त्यांची चढ्या दराने गरजवंत सावज शोधून त्याची विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.वाढते नागरिकीकरण,शहरीकरण यामुळे जमिनीच्या किंमती यां अवकाशाला भिडल्या आहेत.याचा फायदा घेत हे प्लॉटिंगवाले भुमाफिया हे कोणत्याही शासकीय परवानगी,आकृषिक परवानगी,अंतर्गत रस्ते,त्याचबरोबर दिल्या जाणाऱ्या सोयी,यांच्या कोणत्याही परवानगी नसताना सर्वसामान्य नागरिकांना आकर्षित व फसव्या योजनाचे आमिष दाखवत आपले गुंठेवारीचे दुकानदारीचा आपला व्यवसाय बोरिपारधी आणि केडगाव परिसरातून जोरदारपने चालवीत आहेत.
महसूल विभागाला आवाहन……
केडगाव – बोरिपारधी या ठिकाणी असणाऱ्या महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांना हे प्लॉटिंगवाले आवाहन देत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे.शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही परवानगी नसताना,शेती विकसन करत असताना महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणावर महसूल यां लोकांकडून बुडवला जात असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागल्या असल्याने यां सर्व प्लॉटिंगच्या घडणाऱ्या घडामोडीकडे महसूल विभाग डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत असून हे प्लॉटिंग वाले महसूल विभागाला एक प्रकारे आवाहन तर देत नाही ना असा सवाल येथील नागरिक उपस्थित करू लागले आहे..
लाखो रुपयांना विक्री…. आणि फसवून होण्याची शक्यता…
केडगाव – बोरिपारधी येथे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपने अनधिकृतपणे प्लॉटिंग केले जात असून त्यामध्ये रस्ते, वीज, गटरलाईन आणि पाण्याच्या सुविधांचे आमिष खरेदीदारास दाखवले जात आहे.भूमाफियांनी मोठ्या प्रमाणातशेतजमिनीचे लहान लहान गुंठे पाडून प्लॉटिंग सुरू केले आहे.या गुंठ्याची विक्री लाखो रुपयांमध्ये होत असून, शेतजमीन अकृषिक न करता थेट प्लॉटिंग केले जात असून चढ्या व मोठ्या दराने विक्री करत असून भविष्यात मात्र खरेदीदारांची फसवणूक झाल्या शिवाय राहणार नसल्याचे देखील चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.




Discussion about this post