“पुन्हा रस्त्यावर येऊ नको रे बाबा”म्हणून वैतागून केली विनंती

फोटो :- रस्त्यावरील पाण्याचे पूजन करून पुन्हा रस्त्यावर येऊ नको रे बाबा असे साकडे घालताना पारगाव ता. दौंड येथील ग्रामस्थ.
संघर्षनायक वृत्तसेवा पारगाव ता.०१
दौंड तालुक्यातील पारगाव बाजार पेठेतून जाणाऱ्या पारगांव -राहू रस्त्यावर अनेक ठिकाणचे नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचे जुने श्रोत बुजवले गेल्याने पावसाच्या पाण्याचे तळे साचत आहे. तेथील व्यवसायिक, वाहन चालक, ग्रामस्थ हतबल झाले असून या साचलेल्या पाण्याबाबत कोणती हि कारवाई न झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने या पाण्याचे पूजन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
पावसाळ्यात प्रत्येक पावसात या रस्त्यावर सुमारे २ ते ३ फूट उंचीचे व २०० फूट लांब असे पाणी साचत आहे. येथील पाण्याचा अंदाज न आल्याने व खड्डे निर्माण झाल्याने रोज १० ते १५ दुचाकी स्वार या ठिकाणी खड्डे झाल्याने पाण्यात पडत आहेत.तर अनेकांच्या चारचाकी गाड्या बंद पडल्या आहेत. नागरिकांना पायी येण्या जाण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने महिला वर्गाची फार कुचंबना होत आहे. उद्या पासून शाळा सुरु होत असल्याने या ठिकाणाहून शेकडो विद्यार्थ्यांचा राबता असतो.

या रस्त्याच्या कडेला अनेक छोटे मोठे व्यवसाय असून त्यांचे मोठे नुकसान होत आहे.त्या मुळे ग्रामस्थांच्या वतीने” रस्त्यावर पुन्हा येऊ नको बाबा ” असे साकडे घालून या पाण्याचे जलपूजन करून स्थानिक व शासकीय प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
या वेळी विजय चव्हाण, दत्तात्रय आल्हाट, सुरेश ताकवणे, सोमनाथ ताकवणे, सर्जेराव भोसले,दादा आडसूळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

साचलेल्या पाण्यातून दुचाकी घेऊन मार्ग काढताना ग्रामस्थ.
सर्व सामान्य नागरिकाला फक्त रस्ता व्हावा हि माफक अपेक्षा असते. मग तो रस्ता कोणाच्या ताब्यात आहे आणि तो कोणी करणार आहे याच्याशी त्याला काही घेणे देणे नसते. या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडून दिलेले असते. तरी या पाण्याची निचरा होण्या बाबत तातडीने कार्यवाही व्हावी. न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल.
– दत्तात्रय आल्हाट (उपाध्यक्ष -मानवी हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य )
१५००० लोक संख्येच्या गावात गेले १५ दिवसापासून भर बाजार पेठेत हि अवस्था असून हि बाब फार खेद दायक आहे. या ठिकाणी खड्डा झाला असून व्यापारी वर्ग व ग्रामस्थांचा अति अंत न पाहता या पाण्याचे योग्य ते नियोजन करावे.
– विजय चव्हाण (ग्रामस्थ पारगाव )
नैसर्गिक पावसाचे पाणी वाहून जाण्याचे जुने श्रोत बुजवले गेले असल्याने हि परिस्थिती निर्माण झाली आहे.
सदर पाण्याबाबत संबंधित विभागाशी तीन वेळा पत्रव्यवहार केला असून समक्ष भेटून या बाबत तक्रार हि केली आहे. त्यांनी हि या बाबत दखल न घेतल्यास आम्हाला हि आंदोलना शिवाय पर्याय नाही. या रस्त्याचे काम तातडीने चालू करण्याबाबत ठेकेदार यांना सांगितले आहे.
– सुभाष बोत्रे (सरपंच पारगाव )
सर्व सामान्य नागरिकाला फक्त रस्ता व्हावा हि माफक अपेक्षा असते. मग तो रस्ता कोणाच्या ताब्यात आहे आणि तो कोणी करणार आहे याच्याशी त्याला काही घेणे देणे नसते. या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडून दिलेले असते. तरी या पाण्याची निचरा होण्या बाबत तातडीने कार्यवाही व्हावी. न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल.
– दत्तात्रय आल्हाट (उपाध्यक्ष -मानवी हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य )





Discussion about this post