( फोटो :- मृत्यूमुखी पडलेले राजाराम खळदकर व त्यांच्या पत्नी मनीषा खळदकर )
पारगाव संघर्षनायक वृत्तसेवा
दौंड तालुक्यातील नानगाव येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजाराम बापूराव खळदकर वय (५३) व त्यांची पत्नी मनीषा राजाराम खळदकर वय (४६)हे विद्युत मोटारीच्या केबलला करंट आल्याने त्यास चिकटून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. खळदकर यांची जमीन नदीच्या किनारी असल्याने विद्युत पंपहि त्या ठिकाणी असतात. विद्युत पंप ते पॅनल बॉक्स पर्यंत च्या केबल या तेथील गवता मधून गेल्या आहेत. काल सायंकाळी पाच च्या सुमारास नुकताच पाऊस पडून गेला असताना नदीच्या किनारी खळदकर यांची शेळी तेथील गवतातील केबल ला चिटकली तिला वाचविण्यासाठी मनीषा खळदकर या गेल्या व त्याही चिकटल्या.मनीषा यांना वाचविण्यासाठी त्यांचे पती राजाराम खळदकर हे गेले असता शेळीसह या खळदकर पती पत्नीचा विजेचा करंट बसून दुर्दैवी मृत्यू झाला.ऐन दिवाळीच्या सणात गावावर शोककळा पसरली आहे.मनीषा व राजाराम खळदकर यांना एक मुलगा एक मुलगी असून ते शालेय शिक्षण घेत आहेत.
भिमा नदी किनारी वारंवार केबल चोरी मुळे अनेक शेतकरी हैराण झाले असून नवीन केबल चा खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी एक किंवा दोन जोड देऊन विद्युत पंप चालू आहेत. हे जोड सुद्धा त्यांच्या व इतरांसाठी जीव घेणे ठरू शकतात.
आपल्या विद्युत पंपाची केबल कुठे खराब झाली असेल तर ति वेळीच बदलली पाहिजे . जोड दिलेल्या केबल चा वापर करू नये. गवता मधून केबल गेली असल्यास काळजी घेणे गरजेचे आहे.
Discussion about this post