मेंढपाळ आई वडिलांच्या शिरपेचात मानाचा तुरा…. येथील माणकोबावाडी ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत..

(फोटो – नवनाथ लकडे याचे स्वागत करताना यवत आणि माणकोबावाडा येथील ग्रामस्थ.)
यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.२३)
दौंड तालुक्यातील यवत, माणकोबावाडी येथील मेंढपाळ कुटुंबातील नवनाथ लकडे याची भारतीय सैन्यात निवड झाली.माणकोबावाडी परिसरातून प्रथमतः सरकारी नोकरीत आणि देशसेवेसाठी निवड होण्याचा बहुमान नवनाथ लकडे याला मिळाला आहे.कुटुंबातील सदस्य शेती आणि आईवडील मेंढपाळ व्यवसाय करत असताना नवनाथने शिक्षणाची एक वेगळी वाट निवडून सरकारी नोकरीचे स्वप्न त्याने पुर्ण करून माणकोबावाडी,यवत, भांडगाव पंचक्रोशीतील शालेय विध्यार्थी यांना शैक्षणिक प्रेरणा देण्याचे काम नवनाथ लकडे यांनी केले आहे.
नवनाथने योद्धा करिअर ॲकडमी फलटण येथील रणजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथने परीक्षेचा अभ्यास व मैदानी सराव केला.त्याच्या प्रयत्नाला आलेले यश व त्याची भारतीय सैन्यात झालेली निवड यामुळे त्याचे मित्रपरिवार व कुटुंबातील सदस्य तसेच माणकोबावाडीतील ग्रामस्थानी आनंद साजरा केला.
समस्त माणकोबावाडी ग्रामस्थांच्या वतीने नवनाथची भव्य मिरवणूक काढण्यात आली व श्री सिद्धनाथ मंदिर माणकोबावाडी या ठिकाणी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आळे होते.समस्त माणकोबावाडी ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ हार गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ह.भ.प.दिपक मोटे महाराज यांनी सूत्रसंचालन करून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा दिल्या यावेळी माणकोबावाडी, यवत-भांडगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आई वडिलांच्या कष्टाचे केले चीज
नवनाथची आई पारुबाई आणि वडील बाळू लकडे हे शेती व मेंढपाळीचा व्यवसाय करत आहेत.जेमतेम परिस्थिती असताना देखील त्यांनी नवनाथला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.याची जाण नवनाथने ठेवत खडतर परिस्थितीवर मॅट करत आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले असून अनेक विद्यार्थ्यांनी देखील आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन प्रत्येकाने स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत असे मत नवनाथ लकडे यांनी व्यक्त केले.




Discussion about this post