झाडे लावा जाडे जगवा,योजनेच्या विरोधी काम, कोरोना प्रमाणे देश्याच्या फुफ्फुसावर केला जातोय आघात.

संघर्ष नायक वृत्तसेवा राहू (ता.०४)
नैसर्गिक नियमानुसार उपलब्ध असणाऱ्या भूपृष्ठावरील जमिनी पैकी ३३ टक्के क्षेत्र हे जंगल असणे गरजेचे आहे. वाढत्या शहरीकरणामुळे म्हणा किंवा वाढत्या औद्योगिक पट्ट्यामूळे म्हणा हे सूत्र कोठेतरी भिघडलेले आपणास दिसते,परंतु हा वारसा ग्रामीण भाग कायमच जपण्याचा प्रयत्न करत आलेला आहे,ग्रामीण भागात अजूनही भरपूर नैसर्गिक वनसंपदा आहे,ज्याप्रमाणे अमेझॉनचे जंगल हे जगाचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते,त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील वन संपदा ही देखील देशाचे फुफ्फुस म्हणायला हरकत नाही.
परंतु काही दिवसांपासून या वन संपदेला दृष्ट लागल्यासारखी झाली आहे,या फुफ्फुसावर अनेकांचे लक्ष गेले आहे.ग्रामीण भागात तसे उद्योग व्यवसाय कमी प्रमाणात आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की वनसंपदेचे लचके तोडून संपत्ती कमवावी. ग्रामीण भागामध्ये कमी पैशात जास्त उत्पन्न म्हणून लाकूडतोड या व्यवसायाकडे पाहिले जाते.परंतु हा व्यवसाय परंपरागत पद्धतीने केल्यास काही हरकत नाही किंवा त्याने निसर्गाचे जास्त प्रमाणात नुकसान होत नाही, परंतु जर हाच व्यवसाय जर यांत्रिकीकरणाने केल्यास निसर्गाचे अतोनात नुकसान होते आहे.
भूमाफिया ,वाळू माफिया,याचप्रमाणे आता लाकुड माफिया म्हणून नवीन जात उदयाला आलेली आपणास पाहायला मिळते,या माफियांकडे नवीन अत्याधुनिक यंत्रणा आपणास पाहायला मिळते. विजेवर चालणाऱ्या यंत्राने(करवत )१०माणसाचे काम होत असल्यामुळे मजुरीचा विषय खूप कमी झाला आहे.एक जुने मालवाहू वाहन जे की त्याचे सरकारी नियमानुसार आयुष्य संपलेली आहे, एक जनरेटर व दोन ते तीन कामगार घेऊन हे माफिया दिवसाला ६ ते ७ टन ओले लाकुड तोडत आहेत, ६ ते ७ टन लाकूड जमा करण्यासाठी किती जिवंत झाडे तोडावी लागत असतील ,ही झाडे तोडत असताना सरकारी नियमानुसार सौरक्षीत झाडे सुद्धा हे लोक तोडत आहेत, बर हे रोज चालू असून याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.
हे लाकूड उसा पेक्षाही महाग महाग(3ते 4हजार रुपये टन) विकले जाते, म्हणजे एक वाहन दिवसाला १८००० रुपयांचे काम करते.यामध्ये सर्व खर्चाचा हिशेब केला तर जास्तीत जास्त ४०००रुपये खर्च येतो म्हणजे हा माफिया दिवसाला १४००० रुपयाची कमाई करतो, असे प्रत्येक गावात कमीत कमी दोन माफियांच्या टोळ्या आहेत,हे कोठेतरी थांबले पाहिजे,अन्यथा निसर्गाचा ऱ्हास एक दिवस होऊन पश्चातापाची वेळ येईल.
याचे वितरण शक्यतो रात्रीच्या वेळी केले जाते,कारण हा धंदा बेकायदेशीर आहे,हे बेकायदेशीर लाकूड ढाबा, मोठमोठी हॉटेल यांना विकली जातात,तसेच वीट भट्टीला देखील हे लाकूड पुरवले जाते,कारण वीट भट्टीसाठी लागणार दगडी कोळसा हा खूप महाग असतो,त्याला पर्याय म्हणून लाकूड वापरले जाते,हे कमी की काय अलीकडे इंडस्ट्रीयल कंपन्या देखील या माफियांचे ग्राहक झाल्या असल्याचे बोलले जात आहे.,म्हणजे किती मोठया प्रमाणात हा धंदा चालू असेल.याकडे वन विभागाने लक्ष देणे गरजेचे असून त्यांना कुठेतरी आळा बसायला पाहिजे असे मत आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत.




Discussion about this post