
संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.२९)
दौंड तालुक्यातील पाटस पोलीस चौकीच्या परिसरात गेल्या काही महिन्यापासून परिसरातील चौका-चौकांत, आणि तलाव परिसरात मटका अड्डे खुलेआम सुरू आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने मटका अड्डे कुणाच्या आश्रयाने सुरू आहेत याबाबत आता शंका उपस्थित होत आहे.त्यामुळे मटका अड्ड्यांविरोधात पोलिसांच्या कारवाईचे केवळ फार्सच ठरणार का? अशी चर्चा करताना नागरिक दिसत आहेत .
पाटस येथे सध्या सर्वच अवैध व्यवसायाने पुन्हा जोर धरला असल्याचे चित्र दिसत आहे. बंद असलेल्या मटक्याचे अड्डे पुन्हा सुरू होत असून त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी अनेक अड्डे पाहायला मिळू लागले आहेत.मटक्याचे आकडेमोड करणारे खुलेआम चौकात, टपरीवर, हिरव्या नेट मारलेल्या अड्ड्यात ऐटीत करू लागले आहेत.
दुसरीकडे परिसरातील मटका तसेच सर्वच प्रकारचे अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा पोलिस विभागाकडून केला जात आहे.पण,तसे कोठेही दिसून येत नाही.परिसरात अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा होती.मात्र तसे होताना दिसूनचे येत नसल्याने नागरिकांच्यात नाराजी दिसू लागली आहे. पाटस परिसरात खुलेआम मटका व्यवसाय सुरु आहे.यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे.याकडे पोलिसांनी त्वरित लक्ष देऊन असे व्यवसाय बंद करावे अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे.
तो मटका किंग कोण?
पाटस या ठिकाणी सुरु असणारा हा अवैध मटका व्यवसाय हा स्थानिक लोकांना सोबत घेऊन हडपसर येथील एक मटका किंग चालवत असल्याचे नागरिक बोलत आहेत.तो मटका किंग स्वतः समोर येत नसून येथील स्थानिक नागरिकांच्या हवाली हा अड्डा केला असून त्यांच्या अडून हा मटका व्यवसाय जोरदार पणे खुलेआम सुरु असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.




Discussion about this post