
संघर्ष नायक वृत्तसेवा यवत (दि.२७)
केमिकल युक्त ताडीची दौंड तालुक्यातील यवत,साळोबावस्ती,नाथाचीवाडी,राहू,बोरिपारधी याठिकाणी मोठ्या प्रमाणात ताडीची अवैधपणे विक्री चालू असल्याचे दिसून येत आहे.याबाबत मात्र कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यात आता प्रशासना बाबत उलट सुलट चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.मात्र आता त्यावर कारवाई होणार का असा सवाल असा आता नागरिक करू लागले आहेत.
ही हायड्रा केमिकल युक्त ताडी शरीरासाठी अपायकरक असून जीवघेणी असल्याचे नागरिकांच्यात चर्चा आहे.असा सवाल या गावातील महिला वर्ग करू लागला आहे.मात्र याकडे संबंधित विभाग डोळेझाक करत असल्याने या विषारी ताडी विक्री व्यवसयकांचे चांगलेच फावले असून यांची मुजोरी वाढली असल्याची चर्चा परिसरात आहे.
ताडी विक्री अवैध दारूची देखील विक्री ….
राहू येथे एकाच व्यक्तीचे ३ ताडी विक्रीचे अड्डे असून राहू येथील मुख्य दुकानात ताडीसोबतच अवैध दारुविक्रीपण जोरदार पणे सुरु असल्याचे बोलले जात आहे.त्याचबरोबर केडगाव येथील बोरीपारधी व नाथाचीवाडी येथे एकच व्यतीचे ३ अड्डे, त्याचबरोबर साळोबावस्ती येथील झाडाच्या ताडीच्या नावाखाली केमिकलयुक्त ताडी येथील एक युवक परिसरात पुरवठा करत असून त्याचा देखील मोठ्या प्रमाणात धंदा तो चालवीत असल्यामुळे याठिकाणी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.यातून रोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.मात्र आता केमिकलयुक्त ताडीच्या दुकानात राजरोसपणे अवैध दारू विक्री केले जाते आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने संबंधित विभागाकडे संशयित नजरेने पाहण्याचा दृष्टीकोण नागरिकांचा झाला असून यावर कारवाई होणार का? असा यक्ष प्रश्न आता नागरिकांच्या पुढे उभा राहिला आहे.




Discussion about this post