
(राहू,साळोबावस्ती,नाथाचीवाडी,केडगाव,चौफुला,यवत परिसरात मिळत असलेली विषारी केमिकल युक्त ताडी.)
संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.२७)
दौंड तालुक्यातील यवत,साळोबावस्ती, नाथाचीवाडी,राहू,केडगाव,चौफुला याठिकाणी मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त ताडी विक्री करण्याचा व्यवसाय राजरोसपणे चालू असून याबाबत मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या विषारी ताडीविक्री केंद्रावर कारवाई होणार का ? असा सवाल या गावातील महिला वर्ग करू लागला आहे. मात्र याकडे संबंधित विभाग डोळेझाक करत असल्याने या विषारी ताडी विक्री व्यवसयांचे चांगलेच फावले असून हें मात्र या केमिकल युक्त ताडी मुळे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे .
याबाबत सरकारचे १००० प्रोढ झाडामागे एका दुकानास परवानगी देण्यात आली आहे मात्र, या झाडांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.आणि या परिसरात झाडें नसताना देखील झाडाची ताडी या नावाखाली सर्रास विषारी पावडरची ताडी ही विक्रीसाठी सहज उपलब्ध होत आहे.मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र यानिमित्त दिसू लागले आहे. यांच्या डोळेझाकीमुळे येथील तरुण आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या नागरिकांच्या जीवाला या पावडच्या विषारी ताडीमुळे धोका वाढला असून मागील काही घटनात तरुणाचा जीव देखिल गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या ताडीविक्री अड्डयावरकारवाई होणार का अशी चर्चा महिला वर्गातून होऊ लागली आहे.
एकाचेच ताडी विक्री ४ – ५ दुकाने….यवत,साळोबावस्ती येथे झाडाच्या तडीच्या नावाखाली परिसरात पावडरची ताडीची विक्री केली जाते तर ,राहू येथे एकाच व्यक्तीचे ३ अड्डे, त्याचबरोबर केडगाव व नाथाचीवाडी येथे एकाच व्यतीचे ३ अड्डे,चौफुला याठिकाणी एकच व्यक्ती ३ विषारी ताडीची अड्डे चालवीत असल्यामुळे याठिकाणी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.यातून रोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.मात्र स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हें लोक नागरिकांच्या जीवाशी खेळत असून यावर कुठेतरी अंकुश ठेवला जावा अशी माफक मागणी होऊ लागली आहे.
विषारी पावडर आणि नागरिकांच्या जिवाशी खेळ….
‘क्लोरल हायड्रेट’ का घातक ? क्लोरल हायड्रेटमुळे मळमळणे, चक्कर येऊन तोल जाणे, उलटी होणे किंवा अनेकदा तर याच्या अधिक वापरामुळे शुद्धदेखील हरपू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याच्या सेवनाने मेंदू आणि स्नायूंच्या हालचालींतील सुसूत्रता कमी होते. झोपताना या रसायनाचे सेवन केल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून येतात त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या व्यवसायिक कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.असे जेष्ठ आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.




Discussion about this post