
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी भाऊसाहेब ठाकूर उपाध्यक्षपदी मीरा मांढरे यांची सर्वानुमते निवड
संघर्ष नायक वृत्तसेवा राहू (ता.२५)
दौंड तालुक्यातील टाकळी भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब ठाकूर यांची तर उपाध्यक्षपदी मीरा मांढरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेवेळी सर्वानुमते अध्यक्षपदी भाऊसाहेब ठाकूर तर उपाध्यक्षपदाची मीरा मांढरे यांची बिनविरोध निवड करुन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची सूत्रे यांच्याकडे सोपविण्यात आली.
यावेळी माध्यमाशी बोलताना मि सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना सोबत घेऊन शाळेच्या गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासह सर्वांगीण विकासावर आणि विद्यार्थी यांवर भर देणार असल्याचे अध्यक्ष भाऊसाहेब ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी मुख्याध्यक भाऊसाहेब काळे, माजी अध्यक्ष संदीप पांगारकर,काळे मॅडम,शरद शेळकंदे सर,सिकंदर कांबळे सर,योगेश वडघुले,राहुल वडघुले,दिनेश नरसाळे,किरण वडघुले,हनुमंत वडघुले,सरपंच अल्पना ठाकूर,अश्विनी मांढरे,आरती पांगारकर,नीता पांगारकर,दिपाली भालेकर व मोठया संख्येने ग्रामस्थ, तरूण व महिला व पालक उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा उपस्थित ग्रामस्थ आणि पालकांनी शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.




Discussion about this post