
पारगाव संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.२६)
महाराष्ट्र शासनाने प्रमाणित केलेली ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रत्येक गावात चालू झाली होती,त्याचा फायदा हि होत होता. चोरी, दरोडा, आग, जंगली प्राण्यांचा हल्ला, ग्रामसभा, सरकारी योजना, लसीकरण इत्यादी गोष्टींची तात्काळ माहिती देण्यासाठी ग्राम सुरक्षा योजना अतिशय फायदेशीर ठरत होती. परंतु सध्या बहुतांश गावांनी ती थकीत बिला पोटी बंद पडली आहे.
सध्या दौंड तालुक्यात पारगाव मध्ये मागील महिन्यात २२ फाटा व रेणुका नगर भागात चोरट्यांनी काही ठिकाणी डल्ला मारला तर पाच सहा ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच या पूर्वी पारगाव रोडवरील ए. टी. एम. मशीन फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा पाठलाग हि काही तरुणांनी केला होता.एक सराफ दुकानात हि चोरी झाली होती.
पाच सहा दिवसापूर्वी फराफ पेढी लुटण्यासाठी आलेल्या चार पैकी दोन परप्रांतीय चोरांना पारगाव मधील तरुणांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याची ताजी घटना आहे. या चोरांकडे घातक शस्त्र होती. या वेळी पारगाव मधील हि ग्रामसूरक्षा यंत्रणा चालू असती तर सर्व चोर पकडण्यात तरुणांना यश आले असते. ग्रामसुरक्षा यंत्रणा हे एकाच वेळी अनेकांसोबत संपर्क साधण्याचे अत्यंत चांगले माध्यम आहे. ग्रामपंचायतींनी अनावश्यक खर्च टाळून गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्यास प्राधान्य द्यायला हवे.
पारगाव बाजार पेठ हि गावापासून बाजूला आहे. तेथे रहिवासी संख्या कमी आहे. त्या मुळे पारगाव फाट्यावरील चौकात व इतर महत्वाच्या ठिकाणी ग्रामपंचायत च्या माध्यमातून तातडीने सि. सि. टीव्ही कॅमेरे बसविले पाहिजेत.
संजय ताकवणे (ग्रामस्थ पारगाव )तरतूद असल्यास ग्राम सुरक्षा यंत्रणा चालू करण्यात येईल.
मुरलीधर बडे (ग्रामविकास अधिकारी पारगाव )




Discussion about this post