

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पेनेतून नागरिकांच्या हितासाठी स्तुत्य उपक्रम..
यवत वार्ताहर (ता.०२)
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवत पोलीस ठाण्यात नागरिकांसाठी जनसुविधा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते या कक्षाचे अनावरण करण्यात आले.
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांना तक्रारींचे निवारण, चारित्र्य पडताळणी, अर्ज सादर करणे, चौकशीतसेच इतर महत्त्वाच्या माहितींसाठी पोलीस ठाण्यात वारंवार यावे लागते. यामुळे त्यांचा वेळ वाया जातो आणि अनेकदा गैरसोय होते. या पार्श्वभूम ीवर, जनसुविधा कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळेल, त्यांचा वेळ वाचेल आणि पोलीस प्रशासनासोबतचा समन्वय अधिक प्रभावी होईल.
या उपक्रमाची संकल्पना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कक्ष उभारण्यात आला.
या प्रसंगी यवत पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जनसुविधा कक्षामुळे पोलिसांविषयी जनतेच्या मनातील विश्वास वाढेल आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात.
Discussion about this post