
( सनराईज अबॅकसचे १०६ विध्यार्थी यशस्वी )
केडगाव वार्ताहर (ता.०१)
कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत केडगाव येथील चिमुकल्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात झालेल्या विभागीय स्पर्धेतून निवड झालेले सुमारे २४३७ विद्यार्थी व अनेक शाळा व अबॅकस सेंटरने सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेचे आयोजन प्रो ऍक्टिव्ह संस्थेने केले होते.
केडगाव (ता.दौंड) येथील सनराईज अबॅकसचे १०६ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली होती. ४९ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत झळकले. तर ५६ विद्यार्थी उत्तेजनार्थ ठरले. यावेळी सनराईज अबॅकस टीमला ‘बेस्ट सेंटर’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत सहा मिनिटांमध्ये १०० अचूक गणिते सोडवण्याचा विक्रम करणारे विद्यार्थी होते.
ईश्वरी महेश शिंदे ४ मिनिट १३ सेकंदात १०० अचुक गणिते सोडविली. तिला बक्षीस म्हणून सायकल देण्यात आली. पहिला क्रमांक ईश्वरी महेश शिंदे पटकावला तर दुसरा क्रमांक स्नेहल शेळके, देवांश शितोळे,अर्शिया तांबोळी, तिसरा क्रमांक आरती थोरात, श्रृतिका पानसरे, ईश्वरी राऊत यांनी पटकावला. आराध्या शितोळे, शौर्य थोरात, प्रसाद थोरात, स्वराज वांझरे, वेदांत सोडनवर, श्रुतिका वासनीकर, स्वरा रुपनवर, गार्गी महारनोर, अथश्री शेलार, अथर्व शेलार, राजवीर घोगरे, सुफियान शेख, श्रेयस इनामके, सिद्धांत इनामके , श्रीराज कडू, सेजल इनामदार ,श्रेया शेळके, वरद नवले, राजवीर खेनट, हर्षल सर्जे ,श्रीश थोरात, अखिलेश वाघोले, रुद्र दिवेकर, सार्थक जगताप, निर्जला नेवसे, गौरी टुले, वीर लडकत , गुरु भुजबळ , आयुष डेरे, सिद्धांत शेळके, काव्या लाड ,हर्षद राऊत, आयुष टुले, श्लोक कडू, पुष्कर जाधव, वेदांत चांदगुडे, सोहम सोडनवर, राजवीर दळवी, दुर्वा कांबळे, कार्तिक काटे, सुवेद थोरात, आरोही देशमुख आदी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ म्हणून घोषित करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना बापू नवले, कल्पना नवले, आकांक्षा सरतापे, मोहित कुंभार, श्रद्धा टकले, पूनम कडू, आदींनी मार्गदर्शन केले.
Discussion about this post