
फोटो – निषेध करताना डॉ.निलेश लोणकर,सहसंयोजक हिंदु राष्ट्र समन्वय समिती,पुणे जिल्हा
पारगाव (ता :२४)
पेहलगाम येथे झालेल्या भ्याड आणि जिहादी हल्ल्याच्या निषेधार्थ पारगाव ता.दौंड येथे नागरिकांनी निषेध सभेचे (दि.२४) रोजी आयोजन केले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक, पारगाव (सा.मा.), दौड, पुणे येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या आंदोलनातून नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी निषेध सभेत उरी, पठाणकोट, पुलवामा आदी दहशतवादी हल्ल्यांना चोख उत्तर दिल्यानंतरही असे हल्ले थांबायला तयार नाहीत. हे काश्मीरच्या पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यावर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून २७ जणांची निर्दयीपणे हत्या केली. यात एका नवविवाहितेसमोरच तिच्या पतीला मारण्यात आले. ही घटना दहशतवाद्यांची केवळ क्रूरताच नव्हे, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदू समाजावर झालेले थेट आक्रमण दर्शवते. हे जिहादी आक्रमण काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग आहे. याचा केवळ निषेध न करता भारत सरकारने जिहादी अतिरेक्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा सहसंयोजक डॉ. श्री. निलेश लोणकर यांनी केले.
यावेळी पारगाव (सा.मा.) चे माजी उपसरपंच श्री. सोमनाथ आबा ताकवणे, केडगाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर निलेश लोणकर,निवृत्त सुभेदार दिपक शेळके केडगाव येथील स्वामी समर्थ पोलीस अकॅडमीचे संदीप टेंगले सर, कडेठाण येथील गणेश दिवेकर, माजी सैनिक दिपक शेळके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
पारगाव (सा.मा.) गावचे सरपंच सुभाष बोत्रे पारगाव (सा.मा.) गावचे ग्रामपंचायत सदस्य किसन नाना जगदाळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शामराव आबा ताकवणे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे दौंड तालुका संयोजक गणेश ताकवणे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ आंदोलनाला उपस्थित होते.
Discussion about this post