
फोटो : तन्मय व चिन्मय वाघोले यांना शुभेच्छा देताना दौंडचे मा.आमदार आणि जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात व इतर मान्यवर.(छायाचित्र : त्रिभुज शेळके पारगाव)
त्रिभुज शेळके पारगाव वार्ताहर (ता.६)
हौसेला मोल नसते असं म्हणतात,आजकाल समाजामध्ये एखाद्याच्या वाढदिवसाला आतापर्यंत आपण आरोग्य शिबिर ,रक्तदान शिबिर ,बैलगाडा शर्यती ,कुस्ती स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा असे उपक्रम आयोजित केल्याचे आपण पाहिले आहे. परंतु देलवडी (तालुका दौंड) येथील हौशी माऊली वाघोले पाटील या आजोबांनी आपल्या तन्मय वाघोले पाटील व चिन्मय वाघोले पाटील या चिमुकल्या नातवांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चक्क महाराष्ट्रातील सर्वात मोठा रघुवीर खेडेकर हा लोकनाट्य तमाशा मनोरंजन म्हणून आयोजित केला. विशेष म्हणजे आजोबांनी यासाठी १ लाख ४० हजार रुपये मोजले . यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, पारगावचे सरपंच सुभाष बोत्रे, बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे ,माजी उपसभापती सयाजी ताकवणे, बाळासो थोरात, शिवाजी वाघोले, दत्तात्रेय शेलार, अर्जुन वाघोले आदी मान्यवर उपस्थित होते. रमेश थोरात यांनी वाढदिवसानिमित्त या चिमुकल्यांना तमाशाच्या व्यासपीठावरच शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लोकनाट्य तमाशातील तब्बल १०० कलावंत आपल्या कलाकारितून चिमुकल्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या.
लोकनाट्य तमाशा आतापर्यंत गावोगावच्या यात्रेच्या निमित्ताने होत असतो असा पायंडा आहे. परंतु पहिल्यांदाच वाढदिवसाच्या निमित्ताने हा तमाशा होत असल्याने अनेक तमाशा शौकिनांनी गर्दी केली होती.
४ वर्षापूर्वी नातवांच्या वाढदिवसानिमित्त मी निवृत्ती इंदुरीकर महाराजांची किर्तन ठेवले होते. यापूर्वी वाढदिवसानिमित्त अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम केले आहेत.यावेळी वेगळा प्रयत्न केला आहे.तमाशा लोककला आहे. ती कला जोपासण्याचा प्रयत्न याद्वारे करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला. माऊली वाघोले पाटील (आजोबा)
पूर्वी तिकिटावरती तमाशा असायचा. त्यानंतर गावोगावच्या यात्रेनिमित्त तमाशा सुरू झाला. वाघोले हे नातवांच्या वाढदिवसानिमित्त तमाशा घ्यावा यासाठी माझ्याकडे अनेक दिवसांपासून आग्रही होते.वाढदिवसानिमित्त स्पेशल लावणी सादर करत या चिमुकल्यांना हटके शुभेच्छा दिल्या. रघुवीर खेडकर( लोकनाट्य तमाशाचे मालक)
Discussion about this post