दौंड तालुक्यातील बोरिभडक येथील युवा कार्यकर्ते प्रवीण खेडेकर यांच्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांच्यावर दौंड तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि भाजपाचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांनी दिली आहे.यावेळी प्रवीण खेडेकर यांना आमदार राहुल कुल आणि तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड जाहीर करत आमदार राहुल कुल आणि तालुकाध्यक्ष ठोंबरे यांनी यांनी प्रवीण खेडेकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी प्रवीण खेडेकर म्हटले की,युवा मोर्च्याच्या तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्यासाठी पक्षाच्या ध्येय धोरणाचा विचार,पार्टीचे काम तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम नक्कीच मी यशस्वीपणे पार पाडेल आणि सर्वाना सोबत घेऊन काम करेल.खेडेकर यांनी गेल्या काही वर्षात विविध भव्य समाजोपयोगी कार्यक्रम,जनहिताचे उपक्रम,युवकांचा प्रचंड जनसंपर्क यातून समाजात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवलेल्या या युवा नेतृत्वाचा भाजपा पक्षाच्या वतीने सन्मान केल्याने समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात व्यक्त आहे.
Discussion about this post