यवतसह दौंड व उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसारखे २० गुन्हे करणारी टोळी जेरबंद
१० तोळे सोन्याचे दागिने,मोटारसायकल असा सुमारे ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
संघर्षनायक वृत्तसेवा दौंड (दि.१४)
यवतसह दौंड व उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसारखे २० गुन्हे करणारी टोळी यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी जेरबंद केली असून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने,मोटारसायकल असा सुमारे ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याबाबत अधिक माहिती अशी की दि.०४ ऑक्टोंबर रोजी रात्री ०९.३० च्या सुमारास कानगाव गावच्या हद्दीतील रेल्वे पुलाजवळ काही जण दुचाकीसह हत्यारे दरोडा घालण्याचे तयारीत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक सदर ठिकाणी गेले असता चोरट्यांनी दोन्ही मोटार सायकलला आग लावून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता यापैकी सिध्दू रसिकलाल चव्हाण याला लोखंडी कोयत्यासह ताब्यात घेऊन चौकशी केली असता दिपक रसिकलाल चव्हाण (रा. इनामगाव ता. शिरूर) बाबुशा गुलाब काळे (वय २१ रा. शेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), प्रशांत फोटया उर्फ बंडू काळे (रा. राक्षसवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर) हनुमंत फोटया उर्फ बंडू काळे ( रा. राक्षसवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर ) हे साथीदार असल्याचे सांगितले यावेळी पळून गेलेल्या आरोपींचा घेतला असता यापैकी बाबुशा गुलाब काळे याला दौंड पोलीस स्टेशन हद्दीत ताब्यात घेऊन चौकशी केली असता सर्व जण कानगाव येथे दरोडा टाकण्यासाठी आल्याचे सांगितले.
सिध्दू रसिकलाल चव्हाण ( वय १९ रा. इनामगाव तालुका शिरूर) व बाबुशा गुलाब काळे (वय २१ रा. शेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) या दोघांना अटक करून अधिक चौकशी केली असता यवत, दौंड व उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोड्या, दरोडा, जबरी चोऱ्या असे एकुण २० गुन्हे उघडकीस आले असून यामध्ये यवत पोलीस स्टेशन हद्दीतील १७ दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील २ व उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील १ गुन्ह्यांचा समावेश असून त्यांच्याकडून गुन्हातील चोरी केलेले सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोटारसायकल असा सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली सहा. पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, सहाय्यक फौजदार महेंद्र फणसे, पोलीस हवालदार कानिफनाथ पानसरे, हिरालाल खोमणे, गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, अक्षय यादव, रामदास जगताप, विकास कापरे, पोलीस कॉन्स्टेबल मारूती बाराते, गणेश मुटेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, विजय कांचन, राजु मोमीण, पोलीस हवालदार शेख यांच्या पथकाने केली असून दोन्हीही आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करत आहेत.
Discussion about this post