पंढरपूर – मुंबई जाणाऱ्या एसटी बस सहजपूर(ता. दौंड) फाट्याजवळ झाडावर अदळलून बसचा अपघात झाला असून त्यामधील सुमारे २५ ते ३० प्रवाशी जखमी झाल्याची घटना रविवार (दि.२३) रोजी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित जमहिनी झाली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,पुणे- सोलापूर महामार्गावरील सहजपुर फाटा परिसरात परिवहन महामंडळाची एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली आहे.ही बस सोलापूर बाजूने पुणे बाजूने जात असताना ही घटना घडली आहे.या घटनेत २५ ते ३० जण जखमी झाली आहेत.या जखमीमध्ये वारकरी असल्याचे समजते माहिती दिली जात आहे.अपघातस्थळी उरुळी कांचन येथील कस्तुरी रुग्णवाहिका,कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम पोहोचले असून त्यांनी जखमींना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,एसटी बस ही पंढरपूरहुन पुण्याला निघाली होती.साडेबारा वाजनेच्या सुमारास सहजपुर फाट्या जवळ आली असता एसटी बसला ट्रक एसटी बसला अंगावर जाऊन खाली दाबले असल्याचे माहिती मिळत आहे त्यामुले बस पलटी झाली असल्याची माहिती दिली जात आहे.घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली आहे.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस हावलदार शैलेश लोखंडे आणि ननवरे दाखल झाले असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश लोखंडे पुढील तपास करत आहेत.
Discussion about this post