दौंड संघर्षनायक वृत्तसेवा (ता.१४)
मी गेली ४० वर्ष जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्व सामान्य शेतकरी आणि जनतेची सेवा करीत आलो आहे मला कशाचीही अपेक्षा नसून शेतकरी आणि सर्व सामान्य दौंडकरांच्या सेवेसाठी निवडुन द्यावे.राज्यात सत्ता परिवर्तन निश्चित होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे.सत्ता आल्यानंतर मी दौंड तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार आहे.दौंड तालुका पूर्णपणे टँकर मुक्त करू.विकासकामे करायला मी कुठेही कमी पडणार नाही हा शब्द देतो असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांनी दिले.
दौंड लोकसभा मतदारसंघाचे आणि महाविकास आघाडीचे तुतारीचे उमेदवार रमेश थोरात यांनी दौंड आणि वासुंदे, हिंगणीगाडा,पांढरेवाडी,येथील प्रचार सभेत बोलताना केले आहे.शरद पवार पक्षाचे तुतारी चिन्ह घरोघरी आणि जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि तुतारीच्या प्रचारासाठी उमेदवार रमेश थोरात यांचा दौरा दौंड शहरांसह जिरायती भागातील हिंगणीगाडा, वासुंदे,पांढरेवाडी,कुरकुंभ,दौंड येथे(दि.१४) रोजी आयोजित करण्यात आला होता.
आपल्या भाषणात थोरात पुढे म्हणाले, गेल्या ४० वर्षात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विकासासाठी आणि हितावह कामासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून हजारो कोटीं रुपयांनाचे शेतकऱ्याना कर्जवाटप केलेले आहे.यामध्ये प्रामुख्याने जलसिंचन आणि शेतीसाठी पाण्याची योग्य व्यवस्थापन व्हावे आणि दौंड तालुक्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी प्रथम पाईपलाईन,ठिबक सिंचन,याच्या माध्यमातून शेतकऱ्याना मोठया प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आले आहे.माझ्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात जनता दरबार भरवून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे कामे केली आहेत. भीमा नदीवर तीन ठिकाणी उड्डाणपुलाची कामे झाल्याने आज दळणवळणचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
Discussion about this post