२८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन सर्वत्र साजरा करावा – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी – Sangharshnayak
  • About us
  • Contact us
Sangharshnayak
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकिंग न्यूज
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • ई-पेपर
  • प्रायव्हसी पॉलिसी
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकिंग न्यूज
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • ई-पेपर
  • प्रायव्हसी पॉलिसी
No Result
View All Result
Sangharshnayak
Home

२८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन सर्वत्र साजरा करावा – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी

Make no mistake, the tech giants are still the kings.

by संघर्षनायक वृत्तसेवा
January 25, 2025 | 2:17 pm
२८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन सर्वत्र साजरा करावा – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संघर्षनायक वृत्तसेवा दौंड(ता.२३)

२८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन सर्वत्र साजरा करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी दिली.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात सन- २००५ पासून लागू करण्यात आला असून, शासनाने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्याच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमलबजावणी करीता शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली असुन
२८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन असून कायदयातील तरतुदी, कार्यपध्दती, विविध माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देऊन व विविध उपक्रम राबवून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन शासनाच्या निर्देशानूसार साजरा करण्याची मागणी करण्यात आली असून याबाबतची निवेदन विभागीय आयुक्त पुणे विभागचे उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, जिल्हाधिकारी सुहास दिवसे , पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांसह पोलीस आयुक्त, राज्य माहिती आयुक्त पुणे खंडपीठ, महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे देण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविदयालये, विदयापिठे व इतर शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारीत प्रश्नमंजुषा, चित्रकला.. निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजीत करावी यासाठी अशासकिय समाजसेवी संस्थांचा सहयोग घेण्यात यावा. हा उपक्रम व्यापक पातळीवर जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकाराबाबत माहिती होण्यासाठी माहिती अधिकार कायदा प्रभावशाली ठरत असून सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दरवर्षी २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा यावर्षी २८ सप्टेंबर रोजी शनिवार व २९ सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने सदर माहिती अधिकार दिन २७ सप्टेंबर किंवा ३० सप्टेंबर या दिवशी साजरा करावा याबाबतच्या आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयांना याबाबतच्या सूचना कराव्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय असणाऱ्या तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयांसह इतर शासकीय कार्यालयाने देखील माहिती अधिकार दिन साजरा करावा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी केली आहे.

Previous Post

महायुती चा धर्म पाळल्या बद्दल राहुल कुल यांनी मानले मित्र पक्षाचे आभार

Next Post

पाणीप्रश्न मार्गी लावणार,कुठेही कमी पडणार नाही – रमेश थोरात

Discussion about this post

Stay Connected

  • Trending
  • Comments
  • Latest

आधी बिबट्या आता रानगव्याच्या भीतीने शेतकरी भयभीत…. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवल्या रानगव्याचे दर्शन…

May 1, 2025

पारगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

February 25, 2025

यवत पोलीस ठाण्यात जनसुविधा कक्षाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते अनावरण

February 2, 2025

मोरांच्या संवर्धणासाठी लाखाची पदरमोड करणारे सावंत कुटुंब

February 8, 2025
यवत येथील शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दिली कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

यवत येथील शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दिली कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

0
इंग्लिश मिडीयम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थांची अनाथ आश्रमाला भेट.

इंग्लिश मिडीयम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थांची अनाथ आश्रमाला भेट.

0
केडगाव चौफुला परिसरात मटका जोमात….परिसरातील युवक नागरिक होत आहेत कर्जबाजारी…. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज..

केडगाव चौफुला परिसरात मटका जोमात….परिसरातील युवक नागरिक होत आहेत कर्जबाजारी…. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज..

0
कष्टकरी समाजाच्या वतीने माऊली ताकवणे यांचा वाढदिवस उस्फूर्तपणे साजरा.

कष्टकरी समाजाच्या वतीने माऊली ताकवणे यांचा वाढदिवस उस्फूर्तपणे साजरा.

0

श्री संतराज महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात प्रस्थान

June 23, 2025

पारगाव जि. प. शाळेचा ” शाळा प्रवेशोस्तव ” विविध उपक्रमांनी साजरा.

June 19, 2025

आधी बिबट्या आता रानगव्याच्या भीतीने शेतकरी भयभीत…. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवल्या रानगव्याचे दर्शन…

May 1, 2025

पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – डॉ.निलेश लोणकर

April 25, 2025

Recent News

मुख्य संपादक:- संघर्ष नायक
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ,जबाबदारी’ संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.सर्व अधिकार हे संघर्ष नायक मुख्यसंपादक यांच्याकडे राखीव राहतील.

Contact us

sangharshnayaknews@gmail.com

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • ई-पेपर
  • क्राईम
  • ताज्या घडामोडी
  • प्रायव्हसी पॉलिसी
  • ब्रेकिंग न्यूज
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • सामाजिक

Recent News

श्री संतराज महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात प्रस्थान

June 23, 2025

पारगाव जि. प. शाळेचा ” शाळा प्रवेशोस्तव ” विविध उपक्रमांनी साजरा.

June 19, 2025

आधी बिबट्या आता रानगव्याच्या भीतीने शेतकरी भयभीत…. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवल्या रानगव्याचे दर्शन…

May 1, 2025
  • About us
  • Contact us

© 2025 Copyright - All Right Reserved

No Result
View All Result

© 2025 Copyright - All Right Reserved