कृषि महाविद्यालय, पुणे येथील कृषि दूतांनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२०२५ अंतर्गत यवत येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती दिली. या कार्यक्रमा अतंर्गत विद्यार्थ्यांनी विविध नवीन कृषि तंत्रज्ञानाविषयची माहिती शेकऱ्यांपर्यंत पोहचवली यामध्ये बदलते हवामान त्याचा पिकावर होणारा परिणाम, कृषि विषयक ॲप्स यात दामिनी, ई पीक पाहणी, ई नाम यांची माहिती शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कृषि दूत ताकवणे आदित्य, पाटील विश्वजीत, व्यवहारे अनिकेत, झगडे आकाश, कुमावत अजिंक्य, वागज वैभव, जठार पद्माकर, शेख अरबाज,सोनवणे संकेत, सुरवसे नीरज या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.महानंद माने, केंद्र समन्वयक डॉ. व्ही.जे तरडे, केंद्र प्रमुख डॉ.अविनाश गोसावी, कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.डी सावळे यांचे मार्गदर्शन कृषि दूतांना लाभले.
Discussion about this post