संघर्षनायक वृत्तसेवा (ता.२५)
दौंड तालुक्यातील सहजपूर येथील सामजिक कार्यकर्ते दिपक भगवानराव राऊत यांची प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याची मुलुख मैदान तोफ म्हणुन ओळखले जाणारे ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अपंग, अनाथ, विधवा,परितक्त्या,निराधार यांच्या पर्यंत संस्थेचे ध्येय धोरण व कार्याची माहिती व प्रसार प्रचार सर्व सामान्य पर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळून देण्याचे प्रयत्न करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन ही संघटना संपूर्ण राज्यात कार्य करत आहे.
यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव,प्रहार जनशक्ती पक्ष विद्यार्थी विभागचे जिल्हाध्यक्ष शिवराज काळभोर,तसेच विश्वासराव शितोळे,ऋषिकेश बोत्रे सहजपूर गावचे उपसरपंच नितीन कांबळे हे उपस्थित होते.
आमदार बच्चू कडू पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेची ध्येय धोरणे, शासनाच्या अपंगासाठी असणाऱ्या योजना,बेरोजगारी,अपंगाचे राजकीय,सामाजिक,पुनर्वसन आदी सर्व प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सोडविने, तसेच सर्व प्रवर्गातील अपंगाना मुख्य प्रवाहात आणन्यासोबत प्रहार संघटनेचे विचार प्रत्येक अपंगापर्यंत पोहचवून अपंगाला योग्य तो न्याय मिळवून देण्याबाबत ही संघटना कार्यक्रम करत असून राऊत यांनी यां पदाचा अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना न्याय देण्यासाठी करावा बाबत सूचित करण्यात आले आहे.
यावेळी सहजपूरचे विश्वासराव शितोळे,ऋषिकेश बोत्रे,सहजपूर गावचे उपसरपंच नितीन कांबळे आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
Discussion about this post