ग्रामीण भागातील सर्व सोई – सुविधानी सुसज्ज पार्वती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल – डॉ.तात्याराव लहाने… प्रत्येक वर्धापन दिनी ५ रुग्णांचे डोळयांनाचे ओप्रेशन आणि मेडिकल मोफत


दौंड प्रतिनिधी (दि.०८)
            दौंड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या चौफुला (ता.दौंड) येथे रविवार (दि.०७) रोजी कै.तुकाराम खंडू धायगुडे मेडिकल फाउंडेशन संचालित ‘पार्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ हे रुग्णांच्या सेवेत आजपासून रुजू झाले असून जेष्ठ नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उदघाटन झाले आहे.यावेळी डॉ. पल्लवी धायगुडे यांनी परवती हॉस्पिटल तर्फे तात्याराव लहाने यांना शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक सादर करताना प्रदीप धायगुडे यांनी धायगुडे कुटुंबाबद्दल थोडक्यात माहीती देताना सांगितले कि,आज आम्ही जेपण आहोत ते आमचे आजोबा आणि आमचे चुलते कै. तुकाराम खंडू धायगुडे यांच्यामुळे या उंचीपर्यंत पोहचविण्यासाठी आम्हाला त्यांचे खूप मोलाचे योगदान लाभले पण दुर्दैव कि आज ते आमच्यात नाहीत म्हणून त्यांच्या स्मृतीना धायगुडे कुटुंबाकडून उजाळा देण्यात आला.
यावेळी दौंड तालुक्याचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे संचालक यांनी हॉस्पिटल च्या उदघाट्न प्रसंगी शुभेच्छा देत धायगुडे कुटुंबाने रुग्णसेवा चालवीण्याचा एक आगळा वेगळा वसा घेतला असून त्यांच्याकडून रुग्णाची आणि समजची सेवा घडत असल्याचे आणि अशीच उत्तम रुग्ण सेवा त्यांनी द्यावी असे मत थोरात यांनी व्यक्त केले.
भाजपा च्या महिला सरचिटणीस कांचन कुल यांनी देखील शुभेच्छा देत समाजाशी नाळ जुडलेलं कुटुंब म्हणून धायगुडे कुटुंबाचा उल्लेख त्यांनी केला.
 यावेळी अद्ययावत सोयी आणि सुविधानी सुसज्ज अश्या या हॉस्पिटलचे उदघाटन सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते पार्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाट्न पार पडला असून दौंड तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असून सर्व रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ तात्याराव लहाने यांनी केले असून पार्वती हॉस्पिटल च्या डॉ पल्लवी या निष्णात नेत्रतज्ञ असून माझी शिष्य असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले.पुढे आपल्या भाषणात लहाने म्हणाले कि,आपण आपल्या संतुलित आहाराकडे लक्ष दिले पाहिजे बाहेरील जंक फूड खाणे टाळले पाहिजे, आपल्या शरीराला आवश्यक ज्या कॅलरीज आहेत त्याच कॅलरीज आपण आहारात घेने आवश्यक आहे.भारत देशाला मधुमेहचे आगार म्हटले जाते आहे साडेअकराहजार लोक डायलीसिस करतात त्यापैकी साडेनऊ हजार लोक हे मधुमेहाणे ग्रासले आहेत. मधुमेह झाला कि त्याचा परिणाम डोळे, किडनी आणि इत्यादी आवयवावर होत असतो त्यामुळे गोड खाणे शकतो टाळावे, यामध्ये लोक साखर बंद करूण गूळ खातात परंतु गूळ देखील तेवढाच अपायकारक असून गूळ खाणे देखील टाळावे.
मी आत्तापर्यंत ५० लाख रुग्ण पहिले आहेत त्यापैकी साडेचार लाख रुग्णांवर मी मोफत उपचार केले आहेत त्यामुळेच मी एका २९ वर्ष झाली एकाच किडनीवर आहे. यासाठी मी नियमित व्यायाम करतो आहार संतुलित ठेवला असून माझ्या आरोग्याची काळजी मी घेत असून तुम्ही देखील याच पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे देखील त्यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
      यावेळी सदर कार्यक्रम गुरुवर्य अशोकदादा जाधव,गुरुवर्य विकासदादा पाटील, माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात,डॉ.राजेंद्र मुथा,डॉ.रमेश भोईटे,डॉ.डी.एस.लोणकर,विश्वासराव देवकाते,आनंद थोरात,वीरधवल जगदाळे,महेश भागवत, कांचन कुल इत्यादी ग्रामस्थ,मान्यवरांसह दौंड तालुका डॉक्टर असोसिएशन वर दौंड तालुका केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत.सूत्रसंचालन दिनेश गडदे यांनी तर आभार प्रदीप व अविनाश धायगुडे आणि मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!