अकलूज येथील स्पर्धेत वाखारी – चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्राचा डंका, पटकवले पाच लाखांचे प्रथम पारितोषिक 


चौफुला (दि.१५) वार्ताहर
 अकलूज येथे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय तीन दिवसीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये वाखारी – चौफुला (ता.दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या लावणी पथकाला अकलूज (जि.सोलापूर) येथे पार पडलेल्या लावणी स्पर्धेत पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाल्याची माहिती कलाकेंद्राचे प्रमुख डॉ.अशोक जाधव यांनी दिली.
          या लावणी महोत्सवात राज्यभरातुन अनेक संघाने सहभाग घेतला होता.या स्पर्धेत लावणीसह अनेक मिश्र गीतांचा कार्यक्रम झाला.न्यू अंबिका कला केंद्राचे पथकस डॉ.अशोक जाधव व जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी आपले नृत्य सादर केले.न्यू अंबिकाच्या कलाकारांनी मुजरा,गवळण,बैठकीची लावणी,जुगलबंदीच्या,छकड आदी प्रकार सादर केले त्याला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
        यामध्ये न्यू अंबिका कला केंद्र सहभागी कलाकार प्रिया काळे,संगीता काळे,रागिनी जोशी, पायल जाधव, शुभांगी काळे, कोमल काळे, अनिता धमाल,पुष्पा अंधारे, वर्षा अंधारे,मोनिका चंदन, गौरी भोसले,योगिता काळे,सर्व नृत्यांगना भारतीय औंधकर, गायिका शंभूराजे, डावळकर सनी गाडे ढोलकी वादक,संदीप बल्लाळ तबलावादक, रवींद्र जावळे हार्मोनियम, हे सहभागी झाले होते.
 या लावणी स्पर्धा मोहितेपाटील यांनी सुमारे २७ वर्षेपासून याची सुरवात केली असून या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते.या स्पर्धेचे उद्घाटन सुलक्षणादेवी जयसिंग मोहिते पाटील व कांचनमाला मदनसिंग मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.महिलाचा लावणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून स्वरूपारानी मोहिते पाटील यांनी खास महिलांसाठी लावणीचे दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.महिलांच्या कार्यक्रमांस देखील चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!