महिला वनरक्षकाला ठेकेदाराची धक्काबुक्की, वरवंड येथील प्रकार,तिघांवर गुन्हा दाखल..


यवत दि.०२ वार्ताहर

दौंड तालुक्यातील वरवंड येथील वनजमिनीच्या हद्दीतुन जलजीवन मिशनचे खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराची महिला वनरक्षकाला धक्काबुक्की झाल्याची घटना वरवंड गावच्या हद्दीत घडली आहे.

याबाबतची अधिकची माहिती अशी की, (दि.२९) रोजी दु.३ वाजनेच्या सुमारास वरवंड गावाचे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची पाईपलाईनचे काम जे.सी.बी. क्रमांक (एम.एच १२ व्ही.एल.५३७५) मशीनच्या साह्याने खोदकाम चालू असून ठेकेदार अमोल पोपट भोईटे हा कोणताही अधिकृत परवाना नसताना वाखरी गावच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची पाइपलाईन करत असल्याचे या महिला वनरक्षक यांच्या निदर्शनास आले.

Advertisement

यावरून महिला वनरक्षक शितल मेरगळ यांनी जे.सी.बी मशिन व ठेकेदार यांचे विरूध्द वनविभाग कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून जे.सी.बी. मशिन हे जप्त करून चालकास दौंड येथील वन विभाग कार्यालय येथे घेवुन जाण्यास सांगितले असता ठेकेदार अमोल पोपटराव भोईटे यांनी तुम्ही मला पैसे मागितले अशी तुमची खोटी तक्रार करतो व तुम्ही एकटे फिरता तुम्हाला काहीही करू शकतो.असा दम दिला तर ठेकेदार अमोल भोईटे यांनी धक्काबुक्की व शिवागाळ करुन जे.सी.बी. मशिन घेवुन गेले असल्याची फिर्याद वनरक्षक शितल गंगाराम मेरगळ यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली असून यावरून ठेकेदार अमोल पोपटराव भोईटे,ढमाले व ठेकेदार याचा भाचा (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी.सी.बंडगर हे करीत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!