अवकाळीच्या तडाख्यात महावितरण सपाट,विद्युत वाहिन्या तुटल्या,विजेचे खांब जमीनदोस्त.


संघर्षनायक वृत्तसेवा (दि.१९)
अवकाळी पावसामुळे दौंड तालुक्यातील शेतकऱ्यावर अस्मानी संकट ओढवले असून संकट काही शेतकऱ्याची पाठ सोडत नसल्याचे चित्र सध्या दौंड तालुक्यातील खुंटबाव, नाथाचीवाडी, पिंपळगाव, यवत, लडकतवाडी,या गावात पाहायला मिळत आहे.अवकाळीच्या माऱ्यात विजेचे खांब कोसळले असून, वाहिन्याही तुटल्या. या नुकसानीमुळे महावितरण  मात्र सपाट झाले असून, वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे.तालुक्यात अधूनमधून अवकाळी पावसासह वादळी वारा सुटत आहे. या संकटात महावितरणला फटका बसत असून, गत आठवड्यात दौंड तालुक्यातील यवतसह विविध भागात वीज वाहिन्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे.मागील काही दिवसात या अवकाळी संकटात महावितरणला मोठा फटका बसत आहे. एकीकडे नुकसान होत असताना दुसरीकडे दुरुस्तीसाठी मनुष्यबळ आणि साहित्य लागत आहे.त्यामुळे महावितरणचे दुहेरी नुकसान होत आहे.त्यातच वीज खंडित होत असल्याने ग्राहकांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाड्यांच्या फांद्या तुटून वीज वाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या. तर यवत शिवारात लोखंडी खांब वाकून जमिनीला टेकले तर सिमेंट चे खांब उन्माळून पडले आहेत यामुळे यवत नाथाचीवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राची वीज खंडित झाली. त्याचसोबत या भागातील शेतकऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील झाडे, तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महामार्गांवर देखी मोठाले झाडें हि उनमळून पडले असून वाहतूक कोंडीला देखील प्रवाशांना सामोरे जावे लागले आहे. या अवकाळी पावसात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाणीपुरवठा योजना विस्कळीत….
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मारा झाल्याने  भागात वीज वाहिन्यांसह खांब वाकले.यात यवत येथील मुख्य वाहिनीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. गावातील आणि वाडीवसात्यांवरील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
वीजपुरवठा विस्कळीत….
आज साडेपाच वाजणाच्या सुमारास जवळपास तास भर पडलेल्या जोरदार पावसामुळे उन्हाचा चटका कमी झाला मात्र या अवकाळी वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वीज खांब वाकणे, वाहिन्या तुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात महावितरण कडे मनुष्यबळ कमी असल्याने महावितरणच्या कामगारांवार मोठा ताण आला आहे.त्यामुळे यवतयेथील ग्रामीण भागात वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे.तर यवतसह अन्य गावात वीज गूल झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!