अल्पवयीन मुली आणि महिलांच्या छेडछाड प्रकरणात दौंड पोलिसांची कारवाई….तीन वर्ष फरार असणाऱ्या तिघांना केली अटक.


(दि.२१)

दौंड मधील महीलां आणि अल्पवयीन मुलींची छेडछाड करूणाऱ्या आरोपीवर दौंड पोलिसांनी कारवाई करत अटक केले आहे.त्यामध्ये अल्पवयीन मुलींना त्रास देण्याच्या घटना पाहता दौंड पोलिसांनी विशेष लक्ष घातले असून दौंड पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यातील तीन आरोपी अटक केले असल्याची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी,(दि.१९)एप्रिल २०२३ रोजी आरोपी १) राकेश उर्फ रोहित विजय गुळीग (रा.वडारगल्ली ता.दौंड) याच्याविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल होता.त्याचप्रमाणे २०२० मध्ये २) महेश दिलीप रंधवे (रा.मलठण ता दौंड) याच्यावर छेडछाडीसह पोस्कोचा गुन्हा दाखल होता आणि त्यानंतर (दि.६) जुलै २०२३ रोजी ३) लॉरेन्स विल्यम विश्वास (रा.वेताळनगर दौंड) याच्याविरुद्धही छेडछाड व पोस्कोचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हातील आरोपी गुन्हा घडल्यापासून तीन वर्ष फरार होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने महिला आणि मुली यांच्या सुरक्षिततेबाबत कायम सतर्क असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत विशेष मोहीम राबवून महिलांची छेडछाड व त्रास देणाऱ्या फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.दौंड पोलिसांनी अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या या फरार आरोपीना अटक केली आहे.दोन आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.

Advertisement

सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, शरद वारे, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते आदींनी केली आहे.वरील गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे या करीत आहेत.

 

महिला मुलींना त्रास देणाऱ्यांची गय नाही.

शाळा महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी ज्ञात अज्ञाताकडून महिला व मुलींना त्रास देण्याच्या घटना घडत असतील तर त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. जर अशा घटना घडत असतील किंवा त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर तात्काळ दौंड पोलीसांना कळवावे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

चंद्रशेखर यादव.पोलीस निरीक्षक,दौंड पोलीस ठाणे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!