बारामती लोकसभा मतदार संघात तिसऱ्या उमेदवारास बळ मिळणार का ?


पारगाव (दि.१५) वार्ताहर

बारामती लोकसभा मतदार संघात या वेळेस पवार विरुद्ध पवार असा सामना होऊन मतांचे विभाजन होऊन तिसऱ्या उमेदवारास बळ मिळणार का? असा सवाल बारामती लोकसभा मतदार संघातील काही जाणते मतदार उपस्थित करू लागले आहेत.

पवार विरुद्ध पवार असा सामना आणि तो हि स्वतःच्याच मैदानात आता पर्यंतच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे. त्या मुळे पवार विरोधी मतदारांना एका दगडात दोन पक्षी मारण्याची संधी चालून आलेली आहे.या बाबतीत दौंड तालुक्यात नवख्या उमेदवाराचा अंदाज बांधणे किंवा त्या राजकीय परिस्थितीचे अवलोकन करणे हे विचार करण्या पलीकडची परिस्थिती आहे.

Advertisement

२०१४ ला बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रासापा चे महादेव जानकर हे नाव लोकसभा मतदार संघातील मतदारांना माहीत नसताना सुद्धा या नवख्या उमेदवार जानकर यांना दौंड मधून २५००० मतांची आघाडी घेतली होती. त्या नंतर २०१९ ला खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपा चे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी ७००० मतांची आघाडी घेतली होती.आणि विधानसभेला त्याच दौंड मतदार संघात भाजपा चे आमदार राहुल कुल यांना फक्त ७०० मतांची आघाडी मिळाली होती.या वरून दौंडच्या सुज्ञ मतदारांचा अंदाज बांधणे भल्या भल्याना अवघड असल्याचे कळते.

म्हणून पवार विरुद्ध पवार या सामन्यांमध्ये दौंड मध्ये कुल कुटुंबियांवर,इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांचेवर,पुरंदर मध्ये विजय शिवतरे,दादा जाधवराव यांचेवर,भोर मध्ये अनंतराव थोपटे यांचेवर प्रेम करणाऱ्या मतदारांना एका दगडात दोन पक्षी मारण्याची संधी आली असून,या तालुक्यातील लोकसभा साठी पवार विरोधी मतदारांनी तिसराच पर्याय निवडला तर तिसऱ्या उमेदवारास बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!