नाथाचीवाडी झेडपी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न
दौंड (ता.१४) वार्ताहर
नाथाचीवाडी ता. दौंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहस्मेलनाचा कार्यक्रम सोमवार (दि.१२) रोजी संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते विद्येची देवता सरस्वती, आणि नृत्यची देवता नटराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
यावेळी इयत्ता पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता एकूण २५ नृत्य यावेळी विद्यार्थांकडून सादर करण्यात आले, यावेळी शेतकरी नृत्य , तामिळ भाषेतील गाणे, मराठी भाषेतील लावणी, इंग्लिश गाणे, धनगरी नृत्य,सर्व गाण्यावर उत्तम रीतीने डान्स बसविण्याचे काम शिक्षकांनी केले होते त्याचबरोबर खास आकर्षण असा रेन डान्स ने प्रेक्षकांचे मन मोहित करून नागरिकांच्या डोळ्याचे पारणें फेडले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून ४५००० रुपयांची देणगी जमा झाली असून यातून शाळेच्या विकासासाठी ही रक्कम खर्च करण्यात येणार असल्याची माहिती दिली गेली.विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती आणि नागरिकांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी उपस्थित ग्रामस्थानी विद्यार्थ्यावर देखील बक्षीसांचा वर्षाव केला.
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना डान्स साठी मुख्याध्यापक शरद नातू सहशिक्षक सुजित खेडेकर, महिला शिक्षक सुवर्णा शेलार आणि सारिका कुंजीर यांनी डान्स शिकविण्यासाठी ते मुलांना तयार करण्यासाठी खूप कष्ट घेतले. उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती कडून यां शिक्षकांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादबद्दल जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षकांकडून उपस्थितांचे आभार मानण्यात आले.