ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात ज्ञानज्योती ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात स्री शिक्षनाचा पाया रचणाऱ्या ,अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या, पहिल्या महिला शिक्षका, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस सेवानिवृत्त शाखा अभियंता डी .आर . महाजन (वाघोडकर)यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष एस ए.भोईसर, उपाध्यक्ष शरद महाजन, जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे शेख भैय्या शे. करीम, अनिल वाडीले, जगन्नाथ चौधरी, ग्रंथपाल मधुकर वानखेडे ,अनिल नाव्हकर, शांताराम महाजन ,प्रभाकरमहाजन,वाचक व मान्यवर उपस्थित होते.
शाखा अभियंता डी आर महाजन हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा वाचनालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व भावी आयुष्य सुखी ,समृद्धी जावो अशा शुभेच्छा दिल्या .