बहुजन जनता दलात सुनंदा ठाकरे यांचा प्रवेश.पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदी नियुक्ती

बहुजन जनता दलात सुनंदा ठाकरे यांचा प्रवेश.पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदी नियुक्ती
पुणे दि. पुणे जिल्ह्यातील सक्रिय सामाजिक कार्यक्रर्त्या आणि अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती शंभूराजे युवा क्रांती संघटना पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षा सुनंदा गिरिधर ठाकरे यांनी पुरोगामी महाराष्ट्रात शिव शाहू फुले डॉआंबेडकरांच्या विचारावर आधारित बहुजन जनता दल महाराष्ट्रात दलित बहुजनांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक विकासासाठी प्रभावीरीत्या सक्रिय कार्य करीत असुन. बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांचे खंबिर नेतृत्व स्विकारुण त्यांच्यावर विश्वास ठेवून बहुजन जनता दलामध्ये प्रवेश घेत असल्याचे सुनंदा गिरीधर ठाकरे यांनी सांगितले.
बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांचे खंबिर नेतृत्व स्विकारुण आणि बहुजन जनता दलाच्या विचाराने प्रभावित होऊन सुनंदा गिरीधर ठाकरे यांनी बहुजन जनता दलामध्ये प्रवेश केल्या बद्दल बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सुनंदा गिरीधर ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देवून बहुजन जनता दलामध्ये स्वागत केले आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वपरिचित असलेल्या सुनंदा गिरीधर ठाकरे यांनी बहुजन जनता दलामध्ये प्रवेश केल्या बद्दल बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सुनंदा गिरीधर ठाकरे यांची बहुजन जनता दल पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून सुनंदा गिरीधर ठाकरे यांना बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
सुनंदा गिरीधर ठाकरे यांची बहुजन जनता दल पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुनंदा गिरीधर ठाकरे यांचे मंगलाताई पानझाडे सुरेखा बलकवडे रिमा गावंडे वच्छला शेळके ज्योती लांजेवार प्रिया जाधव हिम्मत पाटील रोहित लांडगे राजेश जानकर प्रा भाऊसाहेब वाकचौरे सुभाष इंगळे धनराज पाटील किशोर कदम याकुब शाहा महेंद्र जाधव शिवाजी कांबळे विशाल खंडेराव सचिन गोस्वामी यांच्या सह अनेक बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे