आशा, गटप्रवर्तक व अंगणवाडी सेविका मदतनीस महिलाना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी 28 एप्रिल रोजी दिल्ली पार्लमेंट वर धडक मोर्चा

आशा, गटप्रवर्तक व अंगणवाडी सेविका मदतनीस महिलाना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी 28 एप्रिल रोजी दिल्ली पार्लमेंट वर धडक मोर्चा
या मोर्चास जाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील तीनशे आशा गटप्रवर्तक महिला संपर्क क्रांति एक्सप्रेस नी सकाळी दहा वाजता मिरज येथून दिल्लीस रवाना झाला. याप्रसंगी बोलताना कॉ पुजारी यांनी सांगितले की आशा व गटप्रवर्तक महिला मागील 18 वर्षापासून दररोज सातत्याने आठ तासापेक्षा जास्त वेळ जनतेच्या आरोग्य सेवेचे काम करीत आलेल्या आहेत.तरी त्यांना दरमहा सात हजार रुपये सुद्धा पगार मिळत नाही.
या अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी देशव्यांपी मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.
सध्या देशांमध्ये दहा लाखापेक्षा जास्त आशा काम करीत आहेत त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा ताबडतोब मिळाला पाहिजे. जोपर्यंत शासकीय दर्जा मिळत नाही तोपर्यंत दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी मिरज रेल्वे स्टेशनवर सुमन पुजारी कॉम्रेड विशाल कडवे सुनिता कुंभार इंदुमती येलमर मनिषा पाटिल वानिता हिपरकर अनिता बनसोडे राधिका राजमाने सिमा ठोमके रेखा परीट सुवर्णा सातपुते स्वाती दवणे शकुतला पारसे इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.