कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नागपूर जिल्ह्याची निवड .बहुजन जनता दलाच्या बैठकीत निर्णय .पंडितभाऊ दाभाडे

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नागपूर जिल्ह्याची निवड .बहुजन जनता दलाच्या बैठकीत निर्णय .पंडितभाऊ दाभाडे
पुणे दि. बहुजन जनता दलाच्या पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयात बहुजन जनता दल युवा आघाडी आणि बहुजन जनता दल महिला आघाडी यांच्या संयुक्त राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
या बैठकीला बहुजन जनता दल युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्यामराव हिवराळे राज्यनिरीक्षक सुधाकर काळे व बहुजन जनता दल महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मंगलाताई पानझाडे.राज्य सरचिटणीस अर्चना साबळे. महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा सुनंदा गिरीधर ठाकरे. पुणे शहराध्यक्षा सुरेखा बलकवडे . अरुण बरगडे पुणे जिल्हा अध्यक्ष. मंगेश तायडे युवा जिल्हाध्यक्ष पुणे. दादाराव भोसले पुणे शहर युवा अध्यक्ष. त्यांच्यासह बहुजन जनता दलाचे राज्यस्तरीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते.
आगामी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक युवा व महिला उमेदवारी करिता बहुजन जनता दर संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनात आणि बहुजन जनता दल युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष शामराव हिवराळे. प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी मंगलाताई पानझाडे. महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा सुनंदा गिरीधर ठाकरे. या सर्वांच्या आदेशाने नागपूर येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन जनता दल किंवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शांताराम हिवराळे यांनी यावेळी दिली.
नागपूर येथे सदर होणाऱ्या दोन दिवशीय कार्यक्रर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी राज्यातील पंधरा जिल्हे निवडण्यात आले असून त्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश उल्लेखनीय आहे नागपूर जिल्हा बहुजन जनता दलाच्या सक्रिय प्रभावीरीत्या कामाची दखल घेत बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी नागपूर जिल्ह्याची निवड सदर दोन दिवसीय कार्यक्रर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी निश्चित केल्याचेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी नुकत्याच झालेल्या बहुजन जनता दल युवा आघाडी आणि जनता दल महिला आघाडी यांच्या संयुक्त राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीत सांगितले.
सदर बैठकीचे सूत्रसंचालन महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सुनंदा गिरीधर ठाकरे यांनी केले तर. आभार प्रदर्शन पुणे जिल्हा अध्यक्ष अरुण बरगडे यांनी केले.
यावेळी कैलास परचुरे प्रदेश उपाध्यक्ष राहुल खराटे प्रदेश उपाध्यक्ष.अंकुश पवारे प्रदेश संघटक विवेक पाटील सचिव युवा आघाडी.यांच्या सह बहुजन जनता दल आणि युवा आघाडी. वैद्यकीय कामगार आघाडी .फिल्म सिटी आघाडीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा सुनंदा गिरीधर ठाकरे यांनी कळविले आहे