पुर्व विदर्भ रमाई बिग्रेड च्या अध्यक्षा सुचिता कोटांगले यांच्या वाढदिवस साजरा

पुर्व विदर्भ रमाई बिग्रेड च्या अध्यक्षा सुचिता कोटांगले यांच्या वाढदिवस साजरा
नंददत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी ✍️✍️
पिपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित पुर्व विदर्भ रमाई बिग्रेड च्या अध्यक्षा सुचिता कोटांगले यांचा वाढदिवस पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी सुचिता कोटांगले यांना शाल श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व मिठाई भरवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या रंजना कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पिरिपाचे नेते दिलीप पाटील, भिमराव कळमकर, नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, प्रणय हाडके, शितल बोरकर,रजत डेकाटे,अजय चव्हाण, संजय खांडेकर, मुकेश बांबुडे, कुशीनारा सोमकुवर, प्रतिभा मानवटकर आदींची उपस्थिती होती.